मुंबई - शहरात मागील मार्च पासून कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. हा प्रादुर्भाव कमी होत असताना 16 जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली. मुंबईत आतापर्यंत आरोग्य कर्मचारी, फ्रंट लाईन वर्कर यांना लस देण्यात येत होती. 1 मार्चपासून 60 वर्षावरील जेष्ठ नागरिक आणि 45 वर्षावरील आजार असलेल्या नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात झाली. सोमवारी मुंबईत 42 हजार 420 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. आतापर्यंत एकूण 9 लाख 2 हजार 77 लाभार्थ्यांना लस देण्यात आली.
लसीकरणाची आकडेवारी -
मुंबईत आज 42 हजार 420 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. त्यातील 35 हजार 232 लाभार्थ्यांना पहिला तर 7 हजार 188 लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला. आतापर्यंत एकूण 9 लाख 2 हजार 77 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. त्यात 7 लाख 77 हजार 163 लाभार्थ्यांना पहिला तर 1 लाख 24 हजार 914 लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला. आतापर्यंत एकूण 2 लाख 22 हजार 984 आरोग्य कर्मचारी, 1 लाख 92 हजार 533 फ्रंटलाईन वर्कर, 4 लाख 20 हजार 303 जेष्ठ नागरिक तर 45 ते 59 वर्षामधील गंभीर आजार असलेल्या 66 हजार 258 लाभार्थ्यांना लस देण्यात आली.