मुंबई - वडाळा येथील 'महानगर गॅस लिमिटेड' (एमजीएल) स्थानकाला नैसर्गिक वायूचा पुरवठा करणार्या उरणमधील 'ऑईल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड' (ओएनजीसी) कंपनीत झालेल्या तांत्रिक अडचण निर्माण झाली होती. त्यामुळे, शुक्रवारी कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस (सीएनजी) आणि पाईप नॅचरल गॅसचा (पीएनजी) पुरवठा विस्कळीत झाला होता. परिणामी सीएनजीवर चालणाऱ्या वाहनांसह सार्वजनिक वाहतूक सेवांवर याचा परिणाम झाला.
मुंबईतील गॅस कोंडीचा घरगुती पुरवठ्यावर परिणाम नाही, उद्यापर्यंत पूर्ववत होणार सीएनजी
शहरातील आणि आसपासच्या सुमारे सात लाख वाहनांना 12 लाखांहून अधिक घरांना एमजीएलमार्फत पीएनजी आणि सीएनजीचा पुरवठा होतो. शुक्रवारी सायंकाळी उशिरापर्यंत शहरातील 133 सीएनजी पंप बंद झाले होते. सीएनजी स्थानकांवरील वायूचे प्रमाण कमी होते. परंतु वजन जास्त होते, त्यामुळे नागरिकांना कमी गॅससाठी जास्त पैसे द्यावे लागत होते.

एमजीएलने निवेदन जाहीर केले, की ते पीएनजीचा पुरवठा कायम ठेवणार आहेत. त्यामुळे, सीएनजी पंपांवर आणखी परिणाम होण्याची शक्यता आहे. यामुळे, वडाळा येथील एमजीएलच्या सिटी गेट स्टेशनला होणारा वायू पुरवठा खंडित झाला आहे. एमजीएलने घरगुती गॅस (एलएनजी) पुरवठ्याला सर्वोच्च प्राधान्य दिले असून, कुठेही घरघुती गॅस पुरवठा खंडित झालेला नाही. तर, उद्यापर्यंत गॅस सेवा पूर्ववत होण्याची शक्यता आहे. असे महानगर गॅसकडून सांगण्यात येत आहे.