महाराष्ट्र

maharashtra

VIDEO : मुंबईतील एका अवलियाने दगडांना दिला 'चेहरा', केलेतून निर्माण केली वेगळी ओळख

By

Published : Apr 4, 2022, 10:29 AM IST

दगडांना चेहरा देण्याचे कार्य मुंबईतील सुमन दाभोलकर ( Suman Dabholkar make faces on stone ) हा फाईन आर्टचे शिक्षण घेतलेला विद्यार्थी करत आहे. गावाला नदी किनारी बसलेले असताना तिथे खूप सारे दगड होते. या दगडांमध्ये त्याला विविध चेहरे दिसत होते. आणि इथूनच सुमनच्या वेगळ्या वाटेला सुरुवात झाली.

Mumbai fine art student Suman Dabholkar
सुमन दाभोलकर दगड चेहरे

मुंबई -एखाद्याला सभ्य भाषेत शिवी द्यायची झाल्यास आपण त्याला दगड म्हणतो. निसर्गातील हा एक असा घटक आहे जो नेहमीच वंचित राहिला आहे. 'आपना टाईम आयेगा' अशा आशेवर राहणाऱ्या या दगडांनासुद्धा आता चेहरा ( Suman Dabholkar make faces on stone ) मिळाला आहे. आणि हे काम केले आहे मुंबईच्या एका अवलियाने. या कलाकाराचे नाव आहे सुमन दाभोलकर.

माहिती देताना सुमन दाभोलकर

हेही वाचा -Mumbai Covid Center : मुंबईतील रुग्णसंख्या घटली; कोविड सेंटर बाबात आठ दिवसांत निर्णय

सुमन हा प्रोफेशनल आर्टिस्ट आहे. त्याचे शिक्षणच फाईन आर्टमधून झाले आहे. यात तो वेगवेगळ्या पेंटिंग, वस्तू बनवत असतो. या पारंपरिक कलेतून त्याला स्वतःची वेगळी ओळख निर्माण करायची होती. पण, नेमके काय करायचे हे त्याला कळत नव्हते. लॉकडाऊनमध्ये सर्व बंद असताना सुमन कणकवलीत आपल्या गावाला गेला होता. गावाला नदी किनारी बसलेले असताना तिथे खूप सारे दगड होते. या दगडांमध्ये त्याला विविध चेहरे दिसत होते. आणि इथूनच सुमनच्या वेगळ्या वाटेला सुरुवात झाली.

अशी होते दगडांची निवड :सुमन सांगतात की, एखादा चेहरा रेखाटताना दगड निवडणे हे माझ्यासाठी तसे आव्हानच असते. कारण, प्रत्येक दगडाचा एक पोत असतो. त्याला स्वतःचा एक आकार असतो आणि माझ्या कलेचा हा नियम आहे की, मी जो दगड निवडेन त्याला कोणतीही काटछाट न करता त्याच्यावर चेहरा रेखाटला जाईल. योग्य दगड मिळाल्यानंतरच मी त्याच्यावरती पेंटिंग काम करतो. त्यामुळे, हे माझ्यासाठी खूप मोठे आव्हान असते.

एक चेहरा पूर्ण करण्यासाठी 3 दिवस :काही लोक आपल्या प्रियजनांना, मित्रांना भेट देण्यासाठी आजकाल माझ्याकडे या पेंटिंगच्या ऑर्डर देतात. मग ऑर्डर घेतल्यापासून साधारण तिन दिवसांत मी हा चेहरा पूर्ण करून देतो. कारण यात दगड शोधणे, त्याला साफ करणे, मग त्या दगडावर स्केच करून नंतर रंगरंगोटी करणे, असा त्याचा क्रम असतो. आणि यात साधारण तीन दिवसांचा कालावधी जातो.

चांगली किंमत मिळते :दगडाच्या आकारानुसार मला त्या चित्राची किंमत मिळते. आकाराने मोठा दगड असेल तर त्याची अधिक किंमत असते. दगड शोधण्याची मेहनत आणि त्या चेहऱ्याच्या कलाकुसरीवर येणारा खर्च यासर्वांची योग्य सांगड घालून चित्राची किंमत ठरवली जाते. यात साधारण 5 हजारांपासून ते अगदी 15 हजारांपर्यंत काही दगडी चेहऱ्याची किंमत जाते. याला लोकांचा देखील चांगला प्रतिसाद मिळतो, असे सुमन सांगतात.

हेही वाचा -Price of Petrol & Diesel : इंधन दराचा भडका! पेट्रोल 118 पार, तर डिझेल 103 प्रति लिटर

ABOUT THE AUTHOR

...view details