महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Mumbai Film City Redevelopment : मुंबई चित्रनगरीच्या विकासाकरिता रामोजी फिल्म सिटीला निमंत्रण - Mumbai film city redevelopment

देशभरात सिने उद्योगात बॉलीवूड आघाडीवर आहे त्यापाठोपाठ टॉलीवूडचा क्रमांक लागतो. मात्र, असे असले तरी चित्रपट निर्माण क्षेत्रात आणि चित्रीकरणाच्या सुविधांमध्ये बॉलिवूड पिछाडीवर पडला आहे. मुंबईमध्ये असलेल्या चित्रनगरीच्या पुनर्विकासाचा ( Redevelopment of Mumbai Chitranagari ) प्रकल्प गेल्या काही वर्षांपासून केवळ कागदावर राहिला आहे. त्यामुळे आता राज्य सरकारने मुंबई चित्रनगरीचा पुनर्विकास अद्ययावत असलेल्या हैदराबाद येथील रामोजी फिल्म सिटी ( Ramoji filmy city Hyderabad ) आणि दुबईच्या धर्तीवर करण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई चित्रनगरी
मुंबई चित्रनगरी

By

Published : Feb 21, 2022, 4:07 PM IST

मुंबई-बॉलीवूड म्हणजेच मुंबई फिल्म सिटीला देशातच नव्हे तर जगभरात मान्यता आहे. मात्र, असे असले तरी मुंबईतील चित्रनगरीमध्ये चित्रीकरणाच्या सुविधांची वाणवा जाणवते आहे. त्यामुळे आता दुबई आणि हैदराबाद येथील रामोजी फिल्मसिटीच्या धर्तीवर या फिल्मसिटीचा विकास करण्याचा निर्णय ( Mumbai Filmcity development ) सरकारने घेतला आहे. मुंबईतील विकासासाठी रामोजी फिल्मसीटीला आमंत्रण देण्यात आले आहे.


देशभरात सिने उद्योगात बॉलीवूड आघाडीवर आहे त्यापाठोपाठ टॉलीवूडचा क्रमांक लागतो. मात्र, असे असले तरी चित्रपट निर्माण क्षेत्रात आणि चित्रीकरणाच्या सुविधांमध्ये बॉलिवूड पिछाडीवर पडला आहे. मुंबईमध्ये असलेल्या चित्रनगरीच्या पुनर्विकासाचा ( Redevelopment of Mumbai Chitranagari ) प्रकल्प गेल्या काही वर्षांपासून केवळ कागदावर राहिला आहे. त्यामुळे आता राज्य सरकारने मुंबई चित्रनगरीचा पुनर्विकास अद्ययावत असलेल्या हैदराबाद येथील रामोजी फिल्म सिटी ( Ramoji filmy city Hyderabad ) आणि दुबईच्या धर्तीवर करण्याचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा-Lalu Yadav Fodder Scam : 139 कोटींच्या चारा घोटाळाप्रकरणी लालूंना ५ वर्षांची शिक्षा

सांस्कृतिक मंत्र्यांनी केला रामोजी फिल्म सिटीचा दौरा
मुंबईतील भव्य अशा चित्रनगरीच्या विकासासाठी राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख ( Amit Deshmukh visit to RFC ) आणि चित्रनगरीचे व्यवस्थापकीय संचालक कैलास पगारे यांच्या नेतृत्वाखाली एका अभ्यास मंडळाने हैदराबाद येथील रामोजी फिल्म सिटी आणि दुबई येथील एका चित्रपट स्टुडिओचा पाहणी दौरा अभ्यास केला.

हेही वाचा-BMC On Rane Residence : राणेंच्या निवासस्थानावरुन BMC चे पथक परतले; नेमकी कारवाई काय ते गुलदस्त्यात

अन्य स्टुडिओचीही केली पाहणी- पगारे
आरएफसी ( रामोजी फिल्म सिटी ) आणि दुबईतील स्टुडिओसह अन्य काही स्टुडिओचीही पाहणी केल्याची माहिती मुंबई चित्रनगरीचे व्यवस्थापकीय संचालक कैलास पगारे ( Mumbai Film city director Kailas Pagare ) यांनी दिली. हैदराबाद येथील रामोजी फिल्म सिटी चित्रीकरणासह पोस्ट प्रोडक्शनमधील सुविधा खूप चांगल्या आहेत. त्याचप्रमाणे दुबई फिल्मसिटीमध्येही चित्रपटापूर्वीच्या प्रोडक्शनच्या सुविधा चांगल्या असल्याचे पगारे यांनी सांगितले. या दोन महत्त्वाच्या स्टुडिओशिवाय रामा रायडू, अन्नपूर्णा आणि ए बी प्रसाद या स्टुडिओनांही भेट देऊन पाहणी केल्याचे पगारे यांनी ( Kailas Pagare on RFC ) सांगितले.

हेही वाचा-BMC Notice to Rane : राणे यांच्या बंगल्यात CRZ चे उल्लंघन झाले आहे - महापौर

मुंबई चित्रनगरीच्या पुनर्विकासासाठी आरएफसीला आमंत्रण

दुबईमध्ये चित्रपटांचा उद्योग नाही. मात्र भारतीय चित्रपटांचे दुबईतल्या स्टुडिओत मोठ्या प्रमाणात चित्रीकरण होत असते. विक्रम वेधा या तामिळ चित्रपटाचे संपूर्ण चित्रीकरण दुबईतील स्टुडिओत झाले आहे. त्यामुळे मुंबई चित्रनगरीच्या पुनर्विकासासाठी हैदराबाद येथील रामोजी फिल्म सिटी आणि दुबईच्या स्टुडिओ व्यवस्थापनाला आमंत्रण दिल्याची माहितीही पगारे यांनी दिली.

निविदा प्रक्रियेला थंड प्रतिसाद
मुंबई चित्रनगरीच्या विकासासाठी २०१९ मध्ये जागतिक निविदा ( tender for Mumbai Chitranagari ) काढण्यात आल्या होत्या. मात्र, या निविदांना प्रतिसाद मिळाला नाही. मुंबई चित्रनगरी हा जागतिक चित्रपट निर्मिती केंद्र आणि पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्यासाठी २६०० कोटी रुपयांची योजना असल्याची माहिती पगारे यांनी दिली. मार्च २०१९ मध्ये काढण्यात आलेल्या निविदेला रिलायन्स इंडस्ट्रीने प्रतिसाद दिला होता. मात्र रिलायन्सला ९० वर्षांच्या भाडेकरारावर चित्रनगरीचा ताबा हवा होता. तर राज्य सरकारने ९० वर्षां ऐवजी ६० वर्षांचा भाडे करार करण्याची तयारी दर्शवली होती. त्यामुळे ही निविदा प्रक्रिया फिस्कटली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नव्याने निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

२० स्टुडिओ आणि संग्रहालयाची योजना
मुंबईतील गोरेगाव येथील ५२१ एकर क्षेत्रावर असलेल्या दादासाहेब फाळके चित्रनगरीमध्ये सध्या ११ स्टुडिओ आहेत. या ठिकाणी अद्ययावत २० स्टुडिओ तयार करण्याची योजना आहे. चित्रनगरी पुनर्विकास योजनेअंतर्गत याठिकाणी एक संग्रहालयसुद्धा तयार करण्याची राज्य सरकारची योजना आहे. या संग्रहालयात बॉलिवूडसह मराठी चित्रपटां संदर्भात माहिती उपलब्ध करून दिली जाणार आहे. तसेच या चित्रनगरीत एक चार तारांकित हॉटेल आणि एक सर्वसामान्यांसाठी हॉटेल तयार करण्याचीसुद्धा योजना आहे. याशिवाय पुनर्विकसित चित्रनगरीत स्पेशल इफेक्ट स्टुडिओ ॲनिमेशन सेंटर आणि ॲम्युजमेंट पार्क सुद्धा तयार करण्याचा सरकारचा प्रस्ताव असल्याची माहिती पगारे यांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details