महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Vadapav Price Hike : महागाईचा फटका मुंबईच्या वडापावला; खवय्यांना लागणार ठसका - महागाईमुळे वडापावची किंमती वाढल्या

सर्वच गोष्टी महाग होत असताना आता या महागाईच्या शर्यतीत मुंबईचा प्रसिद्ध वडापाव (Vadapav Price Hike) देखील मागे राहिलेला नाही. या महागाईचा परिणाम मुंबईतील प्रसिद्ध वडापाववरही (Mumbai Vadapav Price Hike) झाला आहे. म्हणजेच आता त्याची चव थोडी महाग होईल. रशिया आणि युक्रेनमधील युद्धामुळे (Russia-Ukraine War) जगातील सर्व देशांच्या आर्थिक स्थितीवर परिणाम झाला आहे.

Mumbai Vadapav
वडापाव फाईल फोटो

By

Published : Apr 18, 2022, 4:28 PM IST

Updated : Apr 22, 2022, 6:01 PM IST

मुंबई -सर्वच गोष्टी महाग होत असताना आता या महागाईच्या शर्यतीत मुंबईचा प्रसिद्ध वडापाव (Vadapav Price Hike) देखील मागे राहिलेला नाही. या महागाईचा परिणाम मुंबईतील प्रसिद्ध वडापाववरही (Mumbai Vadapav Price Hike) झाला आहे. म्हणजेच आता त्याची चव थोडी महाग होईल. रशिया आणि युक्रेनमधील युद्धामुळे (Russia-Ukraine War) जगातील सर्व देशांच्या आर्थिक स्थितीवर परिणाम झाला आहे. युक्रेन आणि रशियासह श्रीलंका, पाकिस्तान, पाश्चात्य देशांसह भारतात महागाई वाढली आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले की त्याचा परिणाम इतर गोष्टींवरही होणे साहजिक आहे. मुंबईतल्या सर्वसामान्यांचे जगणे असलेला वडापावदेखील आता महाग झाला आहे.

हेही वाचा -सचिन तेंडुलकरने बनवलाय वडापाव, शेअर केले फोटो

खाद्य तेलाच्या किमती वाढल्या - देशात खाद्य तेलाच्या किमती वाढल्या आहेत. याचा परिणाम मुंबईतील सर्वात स्वस्त खाद्यपदार्थ वडापाववरही झाला आहे. रुस-युक्रेन युद्धामुळे खाद्यतेल आणि व्यावसायिक सिलिंडरचे दर वाढले आहेत. त्यामुळे मुंबईत वडापावचे दर दोन ते पाच रुपयांनी वाढले आहेत. मुंबईत प्रत्येक गल्लीत वडापाव मोठ्या प्रमाणात विकला जातो. मात्र, आता पूर्वीच्या किमतीत वडापाव विकता येत नसल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. कारण तेल, मिरची आदी सर्वच वस्तूंचे दर वाढले आहेत.

आमचा नाईलाज आहे -दादरमधील प्रसिद्ध वडापाव विक्रेते मनोज सहानी सांगतात की, "व्यावसायिक सिलिंडर आता सुमारे 200 रुपयांनी महागला आहे. सिलिंडरसाठी 2400 रुपये मोजावे लागतात. रिफाइंड तेल सुमारे 1500 ते 2400 रुपयांनी महागले आहे. मिरची 100 रुपये किलोपर्यंत विकली जात आहे. आम्ही वडापावचे दर वाढवले ​​नाहीत तर नुकसान होणार आहे."

हेही वाचा -आज वडापाव दिन... मुंबईत १९६० ला झाला जन्म, अशोक वैद्य यांची शक्कल ठरली मुंबईची ओळख

वडापावचा इतिहास -वडापावचा इतिहास सुमारे 56 वर्षांचा असल्याचे मानले जाते. मुंबईतील निम्न मध्यमवर्गीय कुटुंबातील अशोक वैद्य यांनी प्रथम वडापाव तयार केला होता. 1966 मध्ये मुंबईत शिवसेनेचा प्रभाव वाढत होता. अशोक वैद्य सेनेचे कार्यकर्ता झाले. शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या सर्व कार्यकर्त्यांना आपले कुटुंब चांगले चालावे यासाठी उद्योगपती व्हावे असा सल्ला दिला होता. म्हणजेच कामगारांनी निष्क्रिय बसू नये. छोटे छोटे व्यवसाय करत राहा. यातून प्रेरणा घेऊन अशोक वैद्य यांनी दादर रेल्वे स्थानकाबाहेर बटाटा वडा स्टॉल सुरू केला. तो इतके लोकप्रिय झाला की आज वडापाव हा मुंबईत सर्वाधिक विकला जाणारा नाश्ता आहे.

हेही वाचा -शिल्पा शेट्टीने मारला 'वडापाव'वर ताव

Last Updated : Apr 22, 2022, 6:01 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details