मुंबई : मुंबई जिल्हा सहकारी बँक निवडणूकीत ( Mumbai District Bank Election Result 2021 ) विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या सहकार पॅनलने एकहाती ( Pravin Darekar Mumbai District Bank Election ) वर्चस्व राहिले आहे. सहकार पॅनलचा 21 पैकी 21 जागांवर विजय झाला आहे. 4 जागांसाठी काल मतदान पार पडले होते. तर 17 जागा यापुर्वीच बिनविरोध झाल्या होत्या.
गेल्या काही दिवसांपासून मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणूकीवरुन ( Mumbai District Bank Election Result 2021 ) फार वावटळ उठले होते. बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर हे मजुर या प्रवर्गातून ही निवडणूक लढवत असल्याने हा विरोधी पक्षाने त्यावर आक्षेप घेतला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते व अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी विधान परिषदेत यांनी याबाबत आवाज उठवला होता. दरम्यान, यापुर्वीच सहकार पॅनलच्या १७ जागा बिनविरोध निवडून आल्या होत्या. तर, काल उरलेल्या 4 जागांसाठी मतदान झाले. त्याचा आज निकाल हाती आला असून, चारही जागांवर प्रवीण दरेकर यांच्या सहकार पॅनलचा विजय झाला आहे.
विजयी झालेले उमेदवार