महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मुंबई-दिल्ली राजधानी एक्स्प्रेस गुरुवारपासून रोज धावणार, रेल्वे विभागाचा निर्णय - Rajdhani Express

मध्य रेल्वेची सीएसएमटी ते हजरत निजामुद्दीन राजधानी विशेष गाडी 1 जुलैपासून रोज सुरू होणार आहे. ही गाडी आता आठवड्यातून 4 दिवसांऐवजी पूर्ण आठवडाभर धावणार आहे.

मुंबई-दिल्ली राजधानी एक्स्प्रेस गुरुवारपासून रोध धावणार
मुंबई-दिल्ली राजधानी एक्स्प्रेस गुरुवारपासून रोध धावणार

By

Published : Jun 28, 2021, 10:02 PM IST

मुंबई - मध्य रेल्वेची सीएसएमटी ते हजरत निजामुद्दीन राजधानी विशेष गाडी 1 जुलैपासून रोज सुरू होणार आहे. या गाडीचा क्रमांक 01221/01222 असा आहे. हजरत निजामुद्दीन राजधानी आता आठवड्यातून 4 दिवसांऐवजी पूर्ण आठवडा करण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे.

रेल्वे प्रवाशांना मिळणार दिलासा

ट्रेन क्र. 01221/01222 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ही गाडी आहे. हजरत निजामुद्दीन राजधानी विशेषच्या फेऱ्या १ जुलै २०२१ पासून आठवड्यातून ४ दिवसांऐवजी पुर्णवेळ करण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. ही गाडी आता रेल्वे विभागाच्या पुढील सुचनेपर्यंत दररोज धावणार आहे. या बातमीमुळे मध्य रेल्वे मार्गावरून प्रवास करणाऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

आरक्षण सुरू

राजधानी विशेष ट्रेनचे बुकिंग सर्व पीआरएस केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर उपलब्ध झालेले आहे. या विशेष ट्रेनमध्ये ज्यांच्याकडे अधिकृत तिकीट आहे त्यांनाच प्रवास करता येणार आहे. दरम्यान, सर्व प्रवाशांना बोर्डिंग, प्रवास आणि कोरोना संसर्गामुळे सरकारने घालून दिलेल्या नियमांचे पालन करणे बंधनकारक असणार आहे. प्रवाशांकडून याबाबतचे पालन झाले नाही, तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असेही रेल्वे विभागाने स्पष्ट केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details