महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Silver Oak Attack Case DCP Transfer : शरद पवारांच्या घरावरील हल्लाप्रकरणानंतर डीसीपींची उचलबांगडी - शरद पवार निवासस्थानावर हल्ला

शरद पवार यांच्या निवासस्थानावर हल्ला प्रकरणात DCP योगेश कुमार (Mumbai DCP YogeshKumar) यांची बदली करण्यात आली आहे. निवासस्थानावर हल्ला झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी झोन- 2 चे DCP योगेश कुमार यांना त्यांच्या तात्पुरत्या पदावरून हटवण्यात आले आहे. मुंबई पोलिसांचे सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था) विश्वास नांगरे पाटील यांनी ही कारवाई केली आहे.

DCP Yogesh Kumar
डीसीपी योगेश कुमार

By

Published : Apr 9, 2022, 9:20 PM IST

Updated : Apr 9, 2022, 10:11 PM IST

मुंबई -शरद पवार यांच्या निवासस्थानावर हल्ला प्रकरणात DCP योगेश कुमार (Mumbai DCP YogeshKumar) यांची बदली करण्यात आली आहे. निवासस्थानावर हल्ला झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी झोन- 2 चे DCP योगेश कुमार यांना त्यांच्या तात्पुरत्या पदावरून हटवण्यात आले आहे. नीलोत्पल यांना झोन II चा पदभार देण्यात आला आहे. मुंबई पोलीस सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था) विश्वास नांगरे पाटील यांनी ही कारवाई केली आहे.

डीसीपी योगेश कुमार यांची बदली -एसटी कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी राष्ट्रावादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानावर आंदोलन केले होते. त्यानंतर आता मुंबईचे डीसीपी योगेश कुमार यांची तात्पुरती उचलबांगडी करण्यात आली आहे. गृहमंत्री वळसे पाटील आणि मुंबई पोलीस आयुक्तांमध्ये आज बैठक झाली. त्यानंतर डीसीपी योगेश कुमार यांची बदली करण्यात आली आहे.

काय आहे प्रकरण? - 8 एप्रिलला दुपारी एसटी कर्मचाऱ्यांनी शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्वर ओक या निवासस्थानाबाहेर आंदोलन केले होते. यावेळी जमाव आक्रमक होऊन पवार यांच्या घरावर दगड, चप्पल फेकही केली होती. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी वकील गुणरत्न सदावर्ते आणि इतर 109 एसटी कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली होती. न्यायालयाने गुणरत्न सदावर्ते यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तर इतर कर्मचाऱ्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

Last Updated : Apr 9, 2022, 10:11 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details