मुंबई- दहिसर जंम्बो कोविड सेंटरच्या सुविधांमध्ये वाढ करण्यासाठी आणि समस्यांबाबत लवकर मार्ग काढण्यासाठी आज शिवसेना विभाग क्रमांक 1 चे विभागप्रमुख, आमदार विलास पोतनीस आणि मागाठाणे विधानसभा क्षेत्राचे आमदार प्रकाश सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली पालिकेचे अतिरिक्त आयुक्त पश्चिम उपनगरे, सुरेश काकाणी व परिमंडळ 7 चे प्रभारी उपायुक्त पराग मसुरकर यांच्या बरोबर आज दुपारी संयुक्त पाहणी दौरा आणि मग समस्यांवर चर्चा करण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती.
दहिसर जंम्बो कोविड केंद्राची अतिरिक्त आयुक्तांसह शिवसेना नेत्यांकडून पाहणी - दहिसर जंम्बो कोविड केंद्र
कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण येथे उपचारार्थ दाखल होण्यासाठी येतात त्या रुग्णांचे रजिस्ट्रेशन त्वरित करून त्यांना दाखल करून घ्यावे, वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या पाहता योग्य व्यवस्थापन करण्यासाठी नोडल ऑफिसरची संख्या वाढविणे या विविध समस्यांवर सविस्तर चर्चा झाली. पालिका प्रशासनातर्फे यावर लवकर मार्ग काढला, असे आश्वासन सुरेश काकाणी यांनी आमदार विलास पोतनीस व आमदार प्रकाश सुर्वे यांना दिले.
सदर बैठकीत दहिसर जंम्बो कोविड कोविड केंद्रांमध्ये अतिदक्षता खाटांची संख्या वाढविणे, जे रुग्ण बरे झाले असतील आणि त्यांना आयसीयूची गरज नसल्यास सेमी आयसीयूमध्ये स्थलांतरित करण्यात यावे, व्हॅक्सिनेशन सेंटर वाढविणे आणि व्हॅक्सिनेशन घेण्याकरिता आलेल्या लोकांची गर्दी आटोक्यात आणण्यासाठी होमगार्डची संख्या वाढविणे, फायर ब्रिगेडची गाडी दररोज कोविड सेंटरच्या बाहेर उभी करणे, येथे असणाऱ्या टॉयलेटची रोज साफसफाई करून व्हिडिओ काढणे, जे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण उपचारार्थ आतमध्ये ऍडमिट आहेत, त्यांची दररोज माहिती त्यांच्या नातेवाईकांना एसएमएसद्वारे कळविणे, जे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण येथे उपचारार्थ दाखल होण्यासाठी येतात त्या रुग्णांचे रजिस्ट्रेशन त्वरित करून त्यांना दाखल करून घ्यावे, वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या पाहता योग्य व्यवस्थापन करण्यासाठी नोडल ऑफिसरची संख्या वाढविणे या विविध समस्यांवर सविस्तर चर्चा झाली. पालिका प्रशासनातर्फे यावर लवकर मार्ग काढला, असे आश्वासन सुरेश काकाणी यांनी आमदार विलास पोतनीस व आमदार प्रकाश सुर्वे यांना दिले.
या बैठकीत आर उत्तर विभागाच्या सहायक आयुक्त संध्या नांदेडकर, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.अविनाश वायदंडे, दहिसर जंम्बो कोविड सेंटरच्या अधिष्ठाता दीपा सालियन, प्रभाग समिती अध्यक्ष सुजाता पाटेकर, नगरसेवक बाळकृष्ण ब्रीद, नगरसेविका शीतल म्हात्रे, शाखाप्रमुख प्रकाश पुजारी आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.