मुंबई -दहीहंडी म्हणजेच गोपाळकाला उत्सव मुंबईत Mumbai Dahi Handi Festival मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो मुंबईतल्या प्रत्येक रस्त्यावर अथवा गल्लीबोळात दहीहंडी बांधण्यात येते ही दहीहंडी Dahi Handi Festival फोडण्यासाठी गोविंदा पथक येत असतात. मात्र, गेल्या काही वर्षांपासून या उत्सवाला राजकीय प्रचाराचे, इव्हेंटचे स्वरूप Dahi Handi is political campaign आले आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी या पक्षांनी यापूर्वी या उत्सवात सहभाग घेतला होता. मात्र, आता सर्वच राजकीय पक्षांनी दहीहंडीचा वापर राजकारणासाठी केल्याचे दिसते आहे.
शिवसेनेची दहीहंडी चर्चेचा विषय -दक्षिण मध्य मुंबईतील गिरगाव हा पारंपारिक सण आणि उत्सवासाठी ओळखला जाणारा विभाग आहे. गिरगावातील सर्व सणांची मुंबईभर Dahi Handi Festival In Giragaon छाप असते. गिरगावातील शिवसेना आयोजित केलेली दहीहंडी दरवर्षी गोविंदा पथकांच्या प्रचंड हजेरीने नावाजली जाते. यावर्षीही मोठ्या प्रमाणात गोविंदा पथकांनी या ठिकाणी हजेरी लावली. मात्र, या ठिकाणी विशेष म्हणजे पोस्टरवर तेजस ठाकरे यांचे युवाशक्ती म्हणून झळकलेले मोठे पोस्टर हा चर्चेचा विषय ठरला.