मुंबई- घरचे ताज जेवणे दुपारी मुंबईकरांना पोहचविणारे मुंबईचे डबेवाले ( Mumbai Dabbawala ) १३ ते १७ एप्रिल, असे सलग पाच दिवस सुटीवर गेले आहेत. शासकीय सुट्या व गावची जत्रा याचा योग ते साधणार आहेत.
पाच दिवस डबे बंद -मुंबईकर नोकरदारांना वेळेवर डबा पोहोचविणारे मुंबईचे डबेबाले १३ ते १७ एप्रिल, असे पाच दिवस सुटीवर गेले आहेत. ग्रामदैवत आणि कुलदैवतांच्या यात्रेत सहभागी होण्यासाठी ते आपल्या मूळ गावी रवाना होणार असल्याने या काळात त्यांची सेवा खंडित आहे. या कालावधीत दोन शासकीय सुट्या आणि शनिवार, रविवारची सुटी येत आहे. त्यामुळे बहुतांश आस्थापनांमधील डबे बंद असतील. म्हणूनच त्यांनी हा निर्णय घेतला आहे.
बहुतांश डबेवाले पुण्याचे -मुंबईचे डबेवाले हे बहुतांश पुणे जिल्ह्यातील आहेत. प्रामुख्याने खेड, मावळ या तालुक्यातून व काहीअंशी मूळशी, आंबेगाव, जुन्नर या तालुक्यांतील आहेत. येथील यात्रांचा हंगाम सुरू झाला आहे. गेले दोन वर्षे कोरोनामुळे गावच्या यात्रा बंद होत्या. तसेच मुंबईकर नोकरदार बहुतेक वर्क फ्रॉम होम करत असल्याने बरेच डबेही बंद झाले होते. पण, मागील महिन्यापासून या व्यवसायाला पुन्हा गती आली आहे. पण, सलग सुट्या आल्या असल्याने तसेच निर्बंधमुक्तीनंतर ही त्यांच्या गावची पहिली यात्रा असल्यामुळे त्यात सहभागी होण्यासाठी डबेवाले मूळ गावी जाणार आहेत. त्यामुळे पाच दिवस त्यांची सेवा बंद राहणार आहे.
सुटीच्या पगाराचे पैसे कापू नयेत -या कालावधीत दोन शासकीय सुट्या आणि शनिवार, रविवारची सुटी येत आहे. त्यामुळे बहुतांश आस्थापनांमधील डबे बंद असतील. परीक्षा कालावधी संपल्यामुळे शाळांचे डबेही बंदच आहेत. त्यामुळे या सुटीचा पगार कापू नये, असे आवाहन ‘मुंबई डबेवाला असोसिएशन’ने ग्राहकांना केले आहे.
हेही वाचा -Babasaheb Ambedkar : विनम्र अभिवादन! महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती