महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मुंबई पोलिसांच्या सायबर विभागाकडून नागरिकांना केले जात आहे 'हे' आवाहन - लैंगिक अत्याचार व्हिडिओ आणि सायबर विभाग

नागरिकांना मुंबई पोलिसांकडून आवाहन करण्यात येत आहे की, अल्पवयीन मुलींवरील अत्याचारचे व्हिडिओ व्हाट्सअपवर येत असतील तर ते पुढे प्रसारित करण्यात येऊ नयेत.

मुंबई सायबर विभाग
मुंबई सायबर विभाग

By

Published : May 29, 2021, 6:59 PM IST

मुंबई- व्हाट्सअपसारख्या सोशल माध्यमांचा वापर एकमेकाशी संपर्क ठेवण्यासाठी केला जात असला तरी त्याचा दुरुपयोग होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढल्याचं दिसून येत आहे. मुंबई पोलिसांच्या सायबर पोलिसांनी अशाच एका प्रकरणामध्ये सोशल माध्यमांचा वापर करणाऱ्या नागरिकांसाठी आवाहन केलेले आहे.

मुंबई पोलिसांनी जारी केलेल्या पत्रकानुसार, मुंबई पोलिसांच्या आलेल्या निदर्शनात एका मुलीवर लैंगिक अत्याचार होत असल्याचा व्हिडिओ व्हाट्सअपवर गेल्या काही दिवसांपासून प्रसारित होत आहे. सदर बाबत बंगळुरू सायबर पोलिसांकडे याबाबत गुन्हा दाखल करण्यात आलेला असून अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपींना अटक करण्यात आली आहे.


काय म्हटलंय मुंबई पोलिसांनी?
नागरिकांना मुंबई पोलिसांकडून आवाहन करण्यात येत आहे की अशा प्रकारच्या अल्पवयीन मुलींवरील अत्याचारचे व्हिडिओ व्हाट्सअपवर येत असतील तर ते पुढे प्रसारित करण्यात येऊ नयेत.

1) महिला व बालकांच्या संदर्भातील अश्लील तसेच लैंगिक अत्याचार छळ इत्यादीचे व्हिडिओ फोटो सोशल मीडियावर किंवा इलेक्ट्रॉनिक स्वरूपात कुठेही प्रसारित करू नये.
2) सदरची बाब ही कलम 67 माहिती तंत्रज्ञान कायदा 2018 दखलपात्र गुन्हा आहे. तसेच लैंगिक अपराध पासून बालकांचे संरक्षण कायदा 2012 नुसार देखील हा दखलपात्र गुन्हा असल्याचे मुंबई पोलिसांनी म्हटले आहे.
3) असा प्रकार आढळून आल्यास त्वरित नजीकच्या पोलिस ठाण्यात संपर्क साधून किंवा cyberceime.gov.in या वेबसाईटवर तक्रार दाखल करावी असे आवाहन मुंबई पोलिसांनी नागरिकांना केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details