महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मुंबईने लसीकरणाचा 5 लाखांचा टप्पा ओलांडला - corona vaccination update

मुंबईत मार्च 2020 पासून कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. हा प्रादुर्भाव कमी होत असताना 16 जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली.

कोरोना लसीकरण
कोरोना लसीकरण

By

Published : Mar 12, 2021, 4:59 AM IST

मुंबई - मुंबईत मार्च 2020 पासून कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. हा प्रादुर्भाव कमी होत असताना 16 जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली. मुंबईत आतापर्यंत आरोग्य कर्मचारी, फ्रंट लाईन वर्कर यांना लस देण्यात येत होती. 1 मार्चपासून 60 वर्षावरील जेष्ठ नागरिक आणि 45 वर्षावरील आजार असलेल्या नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात झाली. गुरूवारी (11 मार्च) मुंबईत 36 हजार 933 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. आतापर्यंत एकूण 5 लाख 13 हजार 686 लाभार्थ्यांना लस देण्यात आली.

लसीकरणाची आकडेवारी -

मुंबईत गुरूवारी 36 हजार 933 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. त्यातील 32 हजार 574 लाभार्थ्यांना पहिला तर 4 हजार 359 लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला. आतापर्यंत एकूण 5 लाख 13 हजार 686 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. त्यात 4 लाख 50 हजार 781 लाभार्थ्यांना पहिला तर 62 हजार 905 लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला. आतापर्यंत एकूण 1 लाख 80 हजार 233 आरोग्य कर्मचारी, 1 लाख 20 हजार 115 फ्रंटलाईन वर्कर, 1 लाख 90 हजार 294 जेष्ठ नागरिक तर 45 ते 59 वर्षामधील गंभीर आजार असलेल्या 23 हजार 044 लाभार्थ्यांना लस देण्यात आली.

महापालिकेतील लसीकरण -

मुंबई महापालिकेच्या लसीकरण केंद्रावर आज 18 हजार 015 लाभार्थ्यांना पहिला तर 3 हजार 164 लाभार्थ्यांना दुसरा अशा एकूण 21 हजार 179 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. आतापर्यंत पालिकेच्या लसीकरण केंद्रात 3 लाख 57 हजार 137 लाभार्थ्यांना पहिला तर 54 हजार 523 लाभार्थ्यांना दुसरा अशा एकूण 4 लाख 11 हजार 660 लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले आहे.

सरकारी रुग्णालयातील लसीकरण -

केंद्र आणि राज्य सरकारच्या रुग्णालयातील लसीकरण केंद्रावर आज 1 हजार 185 लाभार्थ्यांना पहिला तर 349 लाभार्थ्यांना दुसरा अशा एकूण 1 हजार 534 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. आतापर्यंत सरकारी रुग्णालयातील लसीकरण केंद्रात 13 हजार 421 लाभार्थ्यांना पहिला तर 1 हजार 834 लाभार्थ्यांना दुसरा अशा एकूण 15 हजार 255 लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले आहे.

खासगी रुग्णालयातील लसीकरण -

खासगी रुग्णालयातील लसीकरण केंद्रावरील आज 13 हजार 374 लाभार्थ्यांना पहिला तर 846 लाभार्थ्यांना दुसरा अशा एकूण 14 हजार 220 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. आतापर्यंत खासगी रुग्णालयातील लसीकरण केंद्रात 80 हजार 223 लाभार्थ्यांना पहिला तर 6 हजार 548 लाभार्थ्यांना दुसरा अशा एकूण 86 हजार 771 लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले आहे.

आतापर्यंतचे लसीकरण-

आरोग्य कर्मचारी - 1,80,233
फ्रंटलाईन वर्कर - 1,20,115
जेष्ठ नागरिक - 1,90,294
45 ते 59 वर्षामधील गंभीर आजार - 23,044

एकूण - 5,13,686

हेही वाचा-एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्याच्या निर्णयाचा फेरविचार करा : नाना पटोले

ABOUT THE AUTHOR

...view details