मुंबई- कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी 16 जानेवारीपासून मुंबईत लसीकरण मोहीम सुरू आहे. या मोहिमेनुसार सोमवार ते बुधवार वॉक इन पद्धतीने येणाऱ्या तर गुरुवार ते शनिवार नोंदणी पद्धतीने येणाऱ्या 45 वर्षावरील नागरिकांचे लसीकरण केले जात आहे. आज मंगळवारी 34 हजार 265 लाभार्थ्यांना लस देण्यात आली आहे. 16 जानेवारीपासून आतापर्यंत एकूण 30 लाख 14 हजार 743 लाभार्थ्यांना लस देण्यात आली आहे. मुंबईत गेल्या चार महिन्यात 30 लाख लसीचे डोस देण्यात आले आहेत.
लसीकरणाची आकडेवारी
मुंबईत आज 34 हजार 265 हजार लाभार्थ्यांना लस देण्यात आली. त्यात 31 हजार 305 लाभार्थ्यांना पहिला तर 2 हजार 960 लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला. आतापर्यंत एकूण 30 लाख 14 हजार 743 लाभार्थ्यांना लस देण्यात आली, त्यात 22 लाख 76 हजार 30 लाभार्थ्यांना पहिला, तर 7 लाख 38 हजार 713 लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला आहे. आतापर्यंत आरोग्य कर्मचाऱ्यांना 3 लाख 1 हजार 347, फ्रंटलाईन वर्करला 3 लाख 59 हजार 150, जेष्ठ नागरिकांना 11 लाख 89 हजार 999, 45 ते 59 वर्षामधील नागरिकांना 10 लाख 65 हजार 41 तर 18 ते 44 वर्षामधील नागरिकांना 99 हजार 206 लसीचे डोस देण्यात आले आहेत.
'मोबाईलवर संदेश आला असेल, तरच लसीकरणाला या'