महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मुंबईने लसीकरणाचा 27 लाखांचा टप्पा ओलांडला, रविवारी 19 हजार 632 लाभार्थ्यांना लस

मुंबईतील कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी 16 जानेवारीपासून लसीकरण मोहीम सुरू आहे. या मोहिमेदरम्यान रविवारी 19 हजार 631 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. 16 जानेवारीपासून आतापर्यंत एकूण 27 लाख 00 हजार 431 लाभार्थ्यांना लस देण्यात आली.

vaccination
vaccination

By

Published : May 9, 2021, 11:53 PM IST

मुंबई -मुंबईतील कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी 16 जानेवारीपासून लसीकरण मोहीम सुरू आहे. या मोहिमेदरम्यान रविवारी 19 हजार 631 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. 16 जानेवारीपासून आतापर्यंत एकूण 27 लाख 00 हजार 431 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. यामुळे मुंबईने लसीकरणाचा 27 लाखांचा टप्पा ओलांडला आहे. दरम्यान लस घेण्यासाठी नागरिकांनी कोविन ऍपवर नोंद केल्यानंतर मोबाईलवर संदेश आला तरच लसीकरणाला यावे असे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.


लसीकरणाची आकडेवारी -


मुंबईत आज 19 हजार 631 हजार लाभार्थ्यांना लस देण्यात आली. त्यात 9 हजार 656 लाभार्थ्यांना पहिला तर 9 हजार 975 लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला. आतापर्यंत एकूण 27 लाख 431 लाभार्थ्यांना लस देण्यात आली त्यात 20 लाख 52 हजार 963 लाभार्थ्यांना पहिला तर 6 लाख 47 हजार 468 लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला. आतापर्यंत एकूण 2 लाख 93 हजार 574 आरोग्य कर्मचारी, 3 लाख 47 हजार 577 फ्रंटलाईन वर्कर, 10 लाख 85 हजार 129 जेष्ठ नागरिक, 45 ते 59 वर्षामधील गंभीर आजार व इतर 9 लाख 49 हजार 248 तर 18 ते 44 वर्षामधील 24 हजार 903 लाभार्थ्यांना लस देण्यात आली.

लसीकरण मोहीम -


मुंबईत कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली. सुरुवातीला आरोग्य कर्मचारी व फ्रंट लाईन वर्करना लस दिली जात होती. 1 मार्चपासून 60 वर्षावरील वयोवृद्ध तसेच 45 ते 59 वर्षामधील विविध गंभीर आजार असलेल्या नागरिकांना लस दिली जात आहे. आज 1 मे पासून 18 ते 45 वर्षामधील लाभार्थ्यांचे लसीकरण सुरु झाले आहे. लसीकरणाला गर्दी होत असल्याने कोविन ऍपवर नोंदणी करून मोबाईलवर संदेश आला असेल तरच लसीकरणाला या असे आवाहन पालिकेने केले आहे.

एकूण लसीकरण -
आरोग्य कर्मचारी - 2,93,574
फ्रंटलाईन वर्कर - 3,47,577
जेष्ठ नागरिक - 10,85,129
45 ते 59 वय - 9,49,248
18 तर 44 वय - 24,903
एकूण - 27,00,431

ABOUT THE AUTHOR

...view details