महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Mumbai Crime : मुंबईत धक्कादायक प्रकार ! महिला मारणार होती उंदीर पण जीव गेला तिचाच - Mumbai Crime

Mumbai Crime : घरात उंदरांची संख्या वाढल्याने महिलेने उंदीर मारण्यासाठी टोमॅटोवर विषारी औषध टाकलं होतं. जेणेकरून हे टोमॅटो खाल्ल्याने उंदीर मरतील, मात्र प्रत्यक्षात भलतंच घडलं आहे.

Mumbai Crime
Mumbai Crime

By

Published : Jul 30, 2022, 11:22 AM IST

Updated : Jul 30, 2022, 12:57 PM IST

मुंबई- मालवणी पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या पास्कल वाडी परिसरात एका 27 वर्षीय महिलेचा टोमॅटो खाल्ल्याने मृत्यू झाला आहे. उंदीर मारण्यासाठी महिलेनेच टोमॅटोमध्ये विष प्राशन केल्याचे मालवणी पोलिसांच्या तपासात उघड झाले असून, यादरम्यान महिला टीव्ही पाहण्यात एवढी हरवून गेली होती की, तिला टोमॅटोमध्ये विष दिल्याचेही आठवत नव्हते. टीव्ही पाहण्याच्या शोधात महिला इतकी हरवली की तिने विषारी टोमॅटो जेवणात टाकून खाल्ले आहे.

Mumbai Crime

पोलिसांचे आव्हान - काही वेळानंतर महिलेने विषारी अन्न प्राशन केल्याने महिलेला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. त्यानंतर स्थानिक डॉक्टरांनी महिलेला कूपर रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. या प्रकरणाचा तपास करणारे मालवणी पोलीस ठाण्याचे तपास अधिकारी पीएसआय मुसा देवर्षी यांनी सांगितले की, महिलेवर कूपर येथे उपचार सुरू होते. मात्र, महिलेच्या शरीरात विष पूर्णपणे पसरल्याने तिचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी सर्वसामान्यांना विषारी पदार्थ लहान मुले आणि खाद्यपदार्थांपासून दूर ठेवण्याचे यावेळी आव्हान केले आहे.

हेही वाचा -Deepak Kesarkar: 'गतिमान आणि जनतेचे सरकार म्हणजे काय हे दाखवणार'- दीपक केसरकर

Last Updated : Jul 30, 2022, 12:57 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details