मुंबई -मोबाइलमध्ये गेम खेळण्याच्या नावाने एका ज्येष्ठ नागरिकाला 22 लाखांना लुबाडले असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ( Mumbai Police ) आरोपींनी 'गुगल पे' चा वापर करत या ज्येष्ठ नागरिकांच्या खात्यातून 22 लाख रुपये लंपास केले आहे. ( Mumbai Crime ) बेस्टच्या सेवेमधून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याच्या आयुष्यभराच्या कमाईवर डल्ला मारणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.
गेम खेळण्याच्या बहाण्याने त्याचा मोबाईल मागितला -मुंबई उपनगरातील गोरेगाव पूर्व येथे राहणारे प्रकाश नाईक हे ( वय- 68 ) बेस्टच्या सेवेतून निवृत्त झाले आहेत. सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांना बेस्टकडून २२ लाख रुपये मिळाले. ( Maharashtra News ) सेवानिवृत्तीनंतर ते दिंडोशी बस डेपोजवळ रोज फिरायला जात. दोन अनोळखी मुले भेटली. दोन्ही मुलांची नाईकशी जवळीक निर्माण झाली.आणि त्यांनी नाईककडून गेम खेळण्याच्या बहाण्याने त्याचा मोबाईल मागितला आणि गुगल पे ऍप्लिकेशन डाऊनलोड करून नाईकच्या खात्यातून दोन महिन्यात २२ लाख रुपये काढले.
22 लाख रुपये लंपास -मुंबईत गोरेगाव पूर्वमध्ये राहणारे प्रकाश नाईक ( वय - 68 ) हे काही महिन्यांपूर्वी बेस्टमधून निवृत्त झाले होते. निवृत्तीनंतर त्यांना बेस्ट प्रशासनाकडून त्यांच्या बँक खात्यात त्यांनी केलेल्या सेवेचा मोबदला, देणी म्हणून जवळपास 22 लाख रुपये देण्यात आले होते. ( Maharashtra News ) निवृत्तीनंतर प्रकाश नाईक गोरेगावमधील दिंडोशी बस आगारात दररोज फिरण्यासाठी जात होते. या ठिकाणी त्यांची ओळख अनोळखी मुलांसोबत झाली होती. ओळख झाल्यावर या दोन्ही मुलांनी प्रकाश नाईक यांचा विश्वास संपादन केला.