मुंबई - मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट 11 ने मुंबईतील तीन वेगवेगळ्या ठिकाणी 7 गोदामांवर छापे टाकले. तसेच परदेशातून एक्सपायरी झालेली कॉस्मेटिक उत्पादने आयात केल्याप्रकरणी एका व्यक्तीला अटक केली आहे. या छाप्यांमध्ये 3.28 कोटी रुपयांची एक्सपायरी झालेली उत्पादने जप्त करण्यात आली आहेत.
एक्सपायर झालेल्या कॉस्मेटिक प्रॉडक्टची करायचे विक्री; 3 कोटींचा माल जप्त, मुंबई पोलिसांची कारवाई - मुंबई क्राईम न्यूज
मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट 11 ने मुंबईतील तीन वेगवेगळ्या ठिकाणी 7 गोदामांवर छापे टाकले. तसेच परदेशातून एक्सपायरी झालेली कॉस्मेटिक उत्पादने आयात केल्याप्रकरणी एका व्यक्तीला अटक केली आहे.
मुंबई गुन्हे शाखेची कारवाई
आरोपी हा कालबाह्य झालेल्या उत्पादनांच्या तारखेवर स्टिकर लावायचा आणि त्यांची मुंबई आणि इतर शहरांमध्ये पुनर्विक्री करायचा. तो युरोप, चीन आणि इतर देशांतून एक्सपायर झालेले कॉस्मेटिक उत्पादने मागवायचा आणि तारखा बदलून मुंबई आणि इतर शहरातील बाजारपेठेत विकायचा.