मुंबई- मुंबईच्या गुन्हे शाखेच्या पोलिसांनी वांद्रे परिसरातून तब्बल 1 कोटी 18 लाखांचा चरस पकडला आहे. चिचंवाडी वॉटर फिल्टर रोड, चायना गेट हाँटेलजवळ हा चरसचा साठा लपवून ठेवला असल्याची माहिती गुन्हे शाखा 7 च्या पोलिसांना मिळाली होती.
वांद्रे परिसरातून तब्बल 1 कोटी 18 लाखांचा चरस जप्त - Mumbai Crime Branch police seized charas
मुंबईच्या गुन्हे शाखेच्या पोलिसांनी वांद्रे परिसरातून तब्बल 1 कोटी 18 लाखांचा चरस पकडला आहे. चिचंवाडी वाँटर फिल्टर रोड, चायना गेट हाँटेलजवळ हा चरसचा साठा लपवून ठेवला असल्याची माहिती गुन्हे शाखा 7 च्या पोलिसांना मिळाली होती.

मुंबईच्या गुन्हे शाखेच्या पोलिसांनी वांद्रे परिसरातून तब्बल 1 कोटी 18 लाखांचा चरस पकडला
पोलिसांनी या कारवाई दरम्यान तब्बल 3, 960 ग्रॅम चरस हस्तगत केले असून हे चरस दोन महिला तस्कर विकत असल्याचे समोर आले आहे. किशोरी गवळी (57), जोहराबी शेख अकबरअली शेख (75) या दोन महिलांना चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मुंबईच्या कानाकोपऱ्यातून चरस तस्करीसाठी या दोघींकडे तस्कर येत असल्याचं तपासात समोर आलं आहे.