मुंबई - राज कुंद्रा पॉर्नोग्राफी चित्रपट प्रकरणाने देशभरात खळबळ उडवून दिली आहे. या प्रकरणी गुन्हे शाखेने कुंद्राचे साथिदार तथा आर्म प्राईम मीडियाचे संचालक सौरभ कुशवाह यांना चौकशीसाठी समन्स बजावला आहे.
पॉर्नोग्राफी प्रकरण: गुन्हे शाखेने बाजावला सौरभ कुशवाहला समन्स - राज कुंद्रा अपडेट न्यूज
प्रॉपर्टी सेलने केलेल्या तपासात राज कुंद्रा यांच्या पॉर्नोग्राफी प्रकरणात आतापर्यंत अनेक धक्कादायक खुलासे पुढे आले आहेत. कुंद्रा यांचा साथिदार सौरभ कुशवाह यांनाही चौकशीसाठी आज बोलावण्यात आले.
संग्रहित छायाचित्र
गुन्हे शाखेतील प्रॉपर्टी सेल कुंद्रा प्रकरणाची चौकशी करत आहे. प्रॉपर्टी सेलने केलेल्या तपासात राज कुंद्रा यांच्या पॉर्नोग्राफी प्रकरणात आतापर्यंत अनेक धक्कादायक खुलासे पुढे आले आहेत. कुंद्रा यांचा साथिदार सौरभ कुशवाह यांनाही चौकशीसाठी आज बोलावण्यात आले. या प्रकरणात कुशवाह यांचा काय संबंध आहे, याबाबत प्रॉपर्टी सेल चौकशी करणार आहे.