मुंबई- पॉर्नोग्राफी प्रकरणात राज कुंद्रा यांच्या अटकेनंतर पॉर्नोग्राफी वर्ल्डचा मोठा खुलासा झाला आहे. या संपूर्ण रॅकेटमध्ये कोण कोण सहभागी आहेत, यांचे जाळे कुठपर्यंत विखुरले आहे याचा तपास करण्यासाठी मुंबई पोलिसांनी एसआयटीची स्थापना केली आहे.
राज कुंद्राच्या अटकेनंतर त्याचं प्रस्थ आणि त्याचा कारभार कुठपर्यंत पसरला आहे, याचा तपास मुंबई पोलीस करत आहेत. या सगळ्याचा तपास करत असताना या पॉर्नोग्राफी प्रकरणाचे लिंक अनेक देशापर्यंत पसरल्या असल्याचे पोलिसांना चौकशीत आढळून आले आहे. विदेशी कंपन्या मार्फत होणारे आर्थिक व्यवहाराची माहिती(ट्रांजेक्शन) मुंबई पोलिसांच्या हाती लागली आहे. यामध्ये काही जणांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे तर काही संशयितांचे शोध सुरू आहेत
या प्रकरणात आता मुंबई क्राइम ब्रांचने एसआयटी स्थापन केली आहे. एसआयटीचा प्रमुख एसीपी दर्जाचा पोलीस अधिकारी असणार आहे. तसंच या प्रकरणाचा तपास करत असताना मिळणारी माहिती आणि त्याचा रिपोर्ट अधिकारी क्राइम ब्रांच प्रमुखाला सादर करणार आहे.