मुंबई :मुंबई पोलिसांच्या खंडणी विरोधी कक्षाने (AEC) सोमवारी एका खंडणी प्रकरणी व्यापारी रियाझ भाटी याला अटक केली. भाटी याला मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंध ( Underworld Don Dawood Ibrahim Associate Riyaz Bhati ) असल्याचा संशय असलेला भाटी वर्सोवा पोलिस स्टेशनमध्ये दाखल ( Anti Extortion Cell of Crime Branch ) झालेल्या खंडणीच्या गुन्ह्यात त्याच्याविरुद्ध तक्रार होती.
वर्सोवा येथील एका व्यावसायिकाला धमकावून बळकावली कार व रोकड :वर्सोवा येथील एका व्यावसायिकाला धमकावण्यात आले आणि त्याच्याकडून 30 लाख रुपये किमतीची कार आणि 7.5 लाख रुपयांची रोकड मागितली गेली. एफआयआरमध्ये इब्राहिमचा ( Salim Fruit and Riyaz Bhati Created This Crime ) जवळचा सहकारी छोटा शकील, तसेच शकीलचा नातेवाईक सलीम फ्रूट यांची नावे आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. अंधेरी (पश्चिम) परिसरातून आरोपीला मुंबई गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी कक्षाने ताब्यात घेतले. एईसी कार्यालयात चौकशी केल्यानंतर भाटीला अटक करण्यात आली. आरोपींना मंगळवारी न्यायालयात हजर केले जाईल, असे ते ( Riyaz Bhati Arrested by Mumbai Crime Branch ) म्हणाले.
यापूर्वी अनेक गुन्ह्यांमध्ये सहभाग :त्याला यापूर्वी खंडणी, जमीन हडप, गोळीबार अशा अनेक गुन्ह्यांमध्ये अटक करण्यात आली होती. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, त्याने 2015 आणि 2020 मध्ये बनावट पासपोर्ट वापरून देशातून पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. अधिकाऱ्यांनी सांगितले की, सलीम कुरेशी उर्फ सलीम फ्रूट सध्या डी-कंपनी सिंडिकेट विरुद्धच्या प्रकरणात राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) अटक केल्यानंतर न्यायालयीन कोठडीत आहे. या प्रकरणाचा अधिक तपास करण्यात येत आहे.