मुंबई - मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Param Bir Singh) यांचा निकटवर्तीय विनय सिंह (Vinay singh) याला मुंबई गुन्हे शाखेने अटक केली (Mumbai Crime Branch) आहे. मुख्य महानगर दंडाधिकारी न्यायालयाने परमबीर सिंगसोबत विनय सिंहलाही फरार घोषित केले होते.
Param Bir Singh Extortion Case : परमबीर सिंग खंडणी प्रकरणात विनय सिंहला मुंबई गुन्हे शाखेकडून अटक
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Param Bir Singh) यांचा निकटवर्तीय विनय सिंह (Vinay Singh) याला मुंबई गुन्हे शाखेने (Mumbai Crime Branch) अटक केली आहे. मुख्य महानगर दंडाधिकारी न्यायालयाने परमबीर सिंगसोबत विनय सिंहलाही फरार घोषित केले होते.
या आदेशाला विनय सिंह याने मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. न्यायालयाने या याचिकेची दखल घेत विनय सिंह याला फरार घोषित करण्याचा आदेश रद्द केला आहे. यानंतर पोलीस सर्वोच्च न्यायालयात गेले, तिकडे उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द झाला. यानंतर विनय सिंह याला पोलिसांनी अटक केली आहे.
- काय आहे प्रकरण?
व्यापारी विमल अग्रवालनं परमबीर सिंग, सचिन वाझे यांच्यासोबत विनय सिंह आणि आणखी दोन जणांच़्या विरोधात गोरेगाव पोलीस स्टेशनमध्ये खंडणीचा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर परमबीर सिंग यांच्यासोबतच विनय सिंहही बरेच दिवस फरार होता, त्यामुळे परमबीर सिंग यांच्यासोबतच पोलिसांनी त्यालाही फरार घोषीत करण्याची प्रक्रीया सुरु करण्याची विनंती न्यायालयाला केली होती. न्यायालयाने त्याला फरार घोषित करण्याची परवानगीही दिली होती.