मुंबई -अंगडिया खंडणी प्रकरणी ( Angadiya Extortion Case ) मोठी कारवाई करण्यात आली आहे. मुंबई गुन्हे शाखेने फरार पोलीस उपायुक्त सौरभ त्रिपाठीचे ( DCP Saurabh Tripathi ) हवालाचे पैसे हाताळल्याच्या आरोपावरुन एका व्यक्तीस अटक केली आहे. पप्पूकुमार प्यारेलाल गौडे असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव ( Mumbai Crime Branch Arrested Pappukumar Gaude ) आहे.
मुंबई गुन्हे शाखेने पप्पूकुमार गौडे ( वय 27 ) याला उत्तरप्रदेशातून अटक केली आहे. यावेळी गौडे याच्याकडून 1.50 लाख रुपये हस्तगत करण्यात आले आहे. त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता, 28 मार्चपर्यंत गुन्हे शाखेची पोलीस कोठडी सुनावली आहे. यापूर्वी याच प्रकरणात लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्याचे निरीक्षक ओम वंगाटे यांना अटक करण्यात आली होती.
सौरभ त्रिपाठीचा शोध घेण्यासाठी पाच पथके
अंगडिया खंडणी प्रकरणी पोलीस उपायुक्त सौरभ त्रिपाठी यांचा शोध घेण्यासाठी मुंबई पोलिसांनी पाच पथके तयार केली आहे. हे पथके उत्तर प्रदेश, राजस्थानसह अनेक ठिकाणी सौरभ त्रिपाठीता शोध घेत आहे. मागील काही दिवसांपासून ते कामावर आलेले नाहीत.
काय आहे प्रकरण?
2021 साली डिसेंबर महिन्यात व्यावसायिक अंगडिया यांच्याकडून आयकरची भीती दाखवत पैसै उकळले होते. लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्यात ओम वंगाटे हे पोलीस निरीक्षक आहेत. त्यांच्यावर अंगडिया यांच्याकडून खंडणी उकळल्याचा आरोप आहे. तसेच, मुंबई गुन्हे शाखेकडून खंडणी उकळल्या प्रकरणी अधिक तपास सुरु करण्यात आला. तेव्हा, उपायुक्त सौरभ त्रिपाठी मागील काही दिवसांपासून पोलीस स्थानकात न आल्याने संशयाची सुई त्यांच्याकडे वळली आहे. त्यामुळे आता चौकशीतून अनेकांची नावे समोर येण्याची शक्यता आहे.
हेही वाचा -The Kashmir Files Controversy : 'तेंव्हाच्या सरकारमध्ये भाजपाचेच लोक होते', काश्मीर फाईल्सवरून शरद पवारांचे टीकास्त्र