मुंबई -मुंबईतील स्टॉक ट्रेडिंग कंपनीचे माजी कर्मचाऱ्याने ट्रेडिंग कंपनीचा डेटा चोरून 3 लोकांचे शेअर्स परस्पर विकले आहे. या प्रकरणी मुंबई गुन्हे शाखेच्या ( Mumbai Crime Branch ) सायबर शाखेने 5 आरोपींना अटक केली आहे. या आरोपींनी साधारणतः 3 कोटी 58 लाखाचे शेअर विक्री केले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी एकाने ओटीपी मिळविण्यासाठी इंटरनेटवरून कॉल केला होता आणि हा कॉल युनायटेड किंगडम येथून असल्याचे दिसून आले. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
Mumbai Crime Branch : स्टॉक ट्रेडिंग कंपनीचे डेटा चोरणाऱ्या 5 जणांना गुन्हे शाखेकडून अटक - ट्रेडिंग कंपनीचा डेटा चोरून 3 लोकांचे शेअर्स परस्पर विकले
स्टॉक ट्रेडिंग कंपनीचे माजी कर्मचाऱ्याने ट्रेडिंग कंपनीचा डेटा चोरून 3 लोकांचे शेअर्स परस्पर विकले आहे. मुंबई गुन्हे शाखेच्या ( Mumbai Crime Branch ) सायबर शाखेने 5 आरोपींना अटक केली आहे. या आरोपींनी साधारणतः 3 कोटी 58 लाखाचे शेअर विक्री केले आहे.
सायबर सेलकडून मिळालेल्या माहितीनुसार डेटा चोरी मे ते 8 जून दरम्यान झाली आहे. ट्रेडिंग कंपनीच्या तक्रारीवरून पोलिसांनी जून महिन्यात अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. आरोपींनी स्टॉक ट्रेडिंग कंपनीचे कर्मचारी असल्याचे भासवत तीन ग्राहकांना फोन करून त्यांचे ओटीपी मागितले. ओटीपी मिळताच त्यांनी त्या ग्राहकांच्या डिमॅट खात्यात प्रवेश घेतला. प्रवेश घेतल्यानंतर आरोपींनी ते शेअर्स विकले आणि ते विकल्यानंतर त्यांना 3.58 कोटी रुपये मिळाले जे त्यांनी दुसऱ्या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्यासाठी वापरले आहे.
हेही वाचा -Fraud of women MLAs: धक्कादायक! भाजपच्या चार महिला आमदारांची फसवणूक; पुण्यात गुन्हा दाखल