महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Fraud of MLAs : कॅबिनेट मंत्रीपद मिळवून देण्यासाठी आमदारांकडे 100 कोटी रुपयांची मागणी, 4 जणांना अटक, गुन्हे शाखेची कारवाई - Fraud of MLAs

कॅबिनेट मंत्रीपद ( Cabinet Minister ) देण्याच्या नावाखाली राष्ट्रीय पक्षाच्या आमदाराला ( MLA ) 100 कोटी रुपयेची मागणी केली असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका आरोपीला अटक ( accused arrested ) केल्यानंतर चौकशी दरम्यान आणखी 3 आरोपींची नावे समोर आले आहे. याबाबत पोलीस ( Police ) तपास करत आहेत

आमदारांना फसवणाऱ्या गुन्हे शाखेकडून अटक
आमदारांना फसवणाऱ्या गुन्हे शाखेकडून अटक

By

Published : Jul 20, 2022, 6:30 AM IST

मुंबई -राज्यात शिंदे सरकार ( Shinde Govt ) अस्तित्वात आल्यानंतर या सरकारमध्ये मंत्रीपदासाठी अनेक आमदार इच्छुक आहेत. त्यामुळे कॅबिनेट मंत्रीपद ( Cabinet Minister ) देण्याच्या नावाखाली राष्ट्रीय पक्षाच्या आमदाराला ( MLA ) 100 कोटी रुपयेची मागणी केली असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ( Mumbai Crime Branch ) या प्रकरणात पोलिसांनी ( Police ) वेशांतर करून, हॉटेल ओबेराय येथे एका आरोपीला अटक ( accused arrested ) केल्यानंतर चौकशी दरम्यान आणखी 3 आरोपींची नावे समोर आले आहे.

मुंबई गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून अटक -राज्यात नवे सरकार स्थापन झाले असून नव्या सरकारच्या मंत्रीमंडळ विस्ताराकडे सध्या सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. मंत्रीपदासाठी इच्छुक आमदार सध्या नंदनवन आणि सागर या शासकीय बंगल्याकडे लक्ष ठेवून आहेत. नेमक्या याच संधीचा फायदा घेत 4 आरोपींनी आमदारांना गाठून त्याची फसवणूक करण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले जात आहे. मंत्रीपद देण्याच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या चौघांना मुंबई गुन्हे शाखेच्या ( Mumbai Crime Branch ) पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. या टोळीने 3 ते 4 आमदारांना गळाला धक्कादायक लावल्याची माहिती मिळाली होती. त्यातील एक पुणे जिल्ह्यातील आमदार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

ऑबेरॉय हॉटेलमध्ये आमदारांची भेट - आरोपींनी आमदारांना विश्वास बसावा म्हणून फोनवर दिल्लीतून आलो असल्याचे सांगत मंत्री महोदय यांनी बायोडेटाबद्दल बोलायचे असल्याचे सांगितले. त्यानंतर 2-3 वेळा आमदारांना दूरध्वनी करून मी एका मोठ्या नेत्याच्या संपर्कात असून मंत्री मंडळात मंत्रीपद देण्यासाठी 100 कोटी रुपये मागितल्याचे सांगितले. त्यानंतर 17 जुलैला आरोपीने ऑबेरॉय हॉटेलमध्ये आमदारांची भेट घेतली. मंत्रीमंडळात सहभागासाठी 90 कोटी रुपये मागत असून त्यातील 20 टक्के रक्कम म्हणजे 18 कोटी रुपये उद्या द्यावे लागतील असे आमदारांना सांगितले होते.

साध्यावेशात पोलिसांनी एका आरोपीला अटक - आरोपीने नरिमन पॉईंट परिसरात आमदाराला भेटण्यासाठी बोलावले. त्यानंतर पैसे घेण्यासाठी आमदाराने त्यांना ऑबेरॉय हॉटेलमध्ये नेले होते. याची कुणकुण पोलिसांना असल्याने साध्यावेशात असलेल्या पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. त्याच्या चौकशीतून इतर 3 आरोपीची नावे समोर आली आहेत.

आमदाराच्या सचिवाने दिलेल्या तक्रारीनुसार -एका आमदाराच्या सचिवाने दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करत, रियाज अल्लाबक्ष शेख ( वय - 41) कोल्हापूर, योगेश मधुकर कुलकर्णी ( वय - 57) पाचपाखाडी- ठाणे, सागर विकास संगवई ( वय- 37) पोखरण रस्ता- ठाणे व जाफर अहमद रशीद अहमद उस्मानी ( वय- 53 ) नागपाडा मुंबई अशी अटक आरोपींची नावे आहेत. आरोपीने अशा पद्धीतीने आणखी कोणाची फसवणूक केली आहे का ? याबाबत पोलीस तपास करत आहेत.

हेही वाचा -MP Supported Shinde Group : ठाकरे गटाला मोठा धक्का; सभागृह नेतेपदी राहुल शेवाळे यांची नियुक्ती तर भावना गवळीच बजावणार व्हीप

ABOUT THE AUTHOR

...view details