मुंबई - आयपीएलचे सामने 23 मार्चपासून सुरू ( IPL matches start from 23rd Match ) होणार आहे. मात्र, मुंबई क्रिकेट असोसिएशनला सुरक्षा पुरविल्यानंतरही मुंबई पोलिसांचे 14 कोटी 82 लाख रुपये थकले ( due amount of Mumbai Police ) असल्याचे माहिती ही आरटीआयमधून ( माहिती अधिकार) उघडकीस आली आहे. त्यामुळे थकीत रक्कम भरेपर्यंत आयपीएल सामन्यांना सुरक्षा देण्यात येऊ नये, अशी मागणी पत्राद्वारे आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली ( RTI Activist Anil Galgali ) यांनी मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांना पत्राद्वारे केली आहे.
मुंबई क्रिकेट असोसिएशनला पुन्हा नवीन क्रिकेट सामन्यासाठी मुंबई पोलीस सुरक्षा उपलब्ध करून देत आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनने मुंबई पोलिसांचे 14.82 कोटी रुपये थकविले आहेत.
मुंबई पोलीस थकबाकीकरिता स्वारस्य घेत नाहीत-
पोलिसांच्या 35 स्मरणपत्रांना मुंबई क्रिकेट असोसिएशनने ( Mumbai Police letter to MCA ) केराची टोपली दाखविली आहे. थकबाकी आधी वसूल केल्यानंतर क्रिकेट सामन्यास सुरक्षा द्यावी, अशी मागणी आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्याकडे ( Anil Galgali letter CP ) केली आहे. वारंवार पत्र व्यवहार करुनही मुंबई पोलीस थकबाकी पैसे वसूल करण्यासाठी स्वारस्य घेत नाही. थकबाकीदार मुंबई क्रिकेट असोसिएशनला पुन्हा नवीन क्रिकेट सामन्यासाठी सुरक्षा उपलब्ध करुन देत आहेत, असे गलगली म्हणाले.
हेही वाचा-Dale Steyn arrives India : आयपीएल 2022 स्पर्धेसाठी डेल स्टेन भारतात दाखल; आता दिसणार 'या' नव्या भूमिकेत
मुंबई पोलिसांची क्रिकेट असोसिएशनला 35 स्मरपपत्रे
मुंबई पोलिस मुंबई क्रिकेट असोसिएशन क्रिकेट सामन्यासाठी सुरक्षा पुरवतात. मुंबईतील क्रिकेट सामन्यांसाठी शुल्क आकारले जाते. विविध सामन्यांसाठी आकारलेले 14.82 कोटी रुपये थकीत आहेत. मुंबई पोलिसांनी थकबाकीची रक्कम वसूल करण्यासाठी मुंबई क्रिकेट असोसिएशनला 35 स्मरणपत्रे पाठविली असल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांना मुंबई पोलिसांनी दिली आहे.
हेही वाचा-IPL 2022 Updates : आयपीएलच्या पंधराव्या हंगामापूर्वी लखनऊ सुपरजायंट्सला मोठा धक्का; मार्क वूड दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, गृहराज्यमंत्री सतेज पाटील आणि अन्य अधिकाऱ्यांना अनिल गलगली यांनी पत्र पाठवून मागणी केली आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून 14.82 कोटी थकबाकी वसूल होइपर्यंत कुठल्याही क्रिकेट सामन्याला सुरक्षा न देणे आणि थकबाकी वसुलीसाठी कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी गलगली यांनी पत्रातून केली आहे. मी याबाबत पत्रव्यवहार करत असून मुंबई पोलिसांनी अद्यापही ठोस कारवाई न केल्याने मुंबई क्रिकेट असोसिएशन मुंबई पोलिसांना गांभीर्याने घेत नाही.
अशी आहे मुंबई पोलिसांची क्रिकेट असोसिएशनकडे थकबाकी
- मुंबई पोलिसांनी गेल्या 8 वर्षातील विविध क्रिकेट सामन्याबद्दल माहिती दिली. या सामन्यांमध्ये वर्ष 2013 मध्ये संपन्न झालेला महिला क्रिकेट विश्वचषक, वर्ष 2016 चा विश्वचषक टी -20, वर्ष 2016 मधील कसोटी सामने, 2017 आणि वर्ष 2018 मध्ये खेळले गेलेले आयपीएल आणि एकदिवसीय सामन्यांचे 14 कोटी 82 लाख 74 हजार 177 रुपये मुंबई क्रिकेट असोसिएशनने अद्याप भरलेले नाहीत.
- मुंबई क्रिकेट असोसिएशनने गेल्या 8 वर्षात फक्त 2018 च्या आयपीएल क्रिकेट सामन्यासाठी आकारलेले 1.40 कोटीचे शुल्क प्रामाणिकपणे अदा केले आहे.
- मुंबई पोलिसांनी दावा केला आहे की आतापर्यंत मुंबई पोलिसांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षांना 35 स्मरणपत्रे पाठवली आहेत.
- तर या थकबाकी रक्कमेवर 9.5 टक्के व्याज आकारले जाणार आहे.
- 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2020 या कालावधीत झालेल्या क्रिकेट सामन्यासाठी घेतलेल्या सुरक्षा अंतर्गत शुल्क अद्याप आकारलेले गेले नाही. कारण किती शुल्क आकारले जावे यासाठी महाराष्ट्र सरकारने अद्याप आदेश जारी केलेला नाही.
- मुंबई पोलिसांनी याबाबत गृह विभागाच्या अपर मुख्य सचिवांना 9 वेळा पत्रव्यवहार केला आहे .पण ढिम्म गृह खाते प्रतिसाद देत नाही.
आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली म्हणाले, की मी याबाबत पत्रव्यवहार करत आहे. मुंबई पोलिसांनी अद्यापही ठोस कारवाई न केल्याने मुंबई क्रिकेट असोसिएशन ही मुंबई पोलिसांना गांभीर्याने घेत नसल्या गलगली यांनी सांगितले.
हेही वाचा-ICC Womens World Cup 2022 : ऑस्ट्रेलियाची सेमिफायलमध्ये धडक; भारतावर 6 विकेट्सने मात