मुंबई - मुंबईचे बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेला(Sachin Waze) न्यायालयाने खंडणीच्या प्रकरणात(Extortion Case) आता 15 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी(Police Custody) सुनावली आहे. आज सचिन वाझेची पोलीस कोठडी संपली असून, त्याला न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी पुन्हा दोन दिवसांची पोलीस कोठडी वाझेला देण्यात आली आहे.
गोरेगावमधील एका वसुली प्रकरणात सचिन वाझेला मुंबई गुन्हे अन्वेषण विभागाने ताब्यात घेतले होते. वाझेचा ताबा मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केले होते. त्यावेळी त्याला 6 नोव्हेंबरपर्यंत कोठडी सुनावण्यात आली होती. पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आलं असता, त्याच्या कोठडीत 13 नोव्हेंबरपर्यंत वाढ करण्यात आली होती. आज पुन्हा 15 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली आहे.
- आरोप काय?
गोरेगावमधील विमल अग्रवाल नावाच्या व्यापाऱ्याने सचिन वाझे, परमबीर सिंग, सुमित सिंह, अल्पेश पटेल, विनय सिंह आणि रियाज पटेल यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. माझं पार्टनरशिपमध्ये गोरेगाव येथे BOHO रेस्टॉरंट आणि बार आहे. अंधेरीमध्ये BCB स्टोअर आणि बार आहे. हे दोन्ही चालू ठेवण्यासाठी सचिन वाझे आणि अन्य आरोपींनी 9 लाख रुपये घेतले होते. आरोपींनी जानेवारी- फेब्रुवारी 2020 पासून ते मार्च 2021 या काळात 9 लाखांची वसूली केली आहे, असा आरोप अग्रवाल यांनी तक्रारीत केला होता. अग्रवाल यांच्या आरोपानंतर मुंबई पोलिसांनी याप्रकरणी भारतीय दंड संहिता नुसार 384 ,385 आणि 34 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
- कोण आहे सचिन वाझे?