मुंबई - कोरोना विषाणूच्या प्रसारामुळे महापालिकेचा महसूल घटला आहे. पालिकेचे बँकांमध्ये ८० हजार कोटींच्या ठेवी आहेत. त्यानंतरही पालिका चार हजार कोंटीचे कर्जरोख्यातून निधी उभारला जाणार आहे. कर्जरोखे उभारण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. याचे पडसाद आज स्थायी समितीच्या बैठकीत उमटले. सर्वपक्षीय सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरत आर्थिक परिस्थितीबाबत श्वेतपत्रिका काढण्याची मागणी नगरसेवकांनी लावून धरली.
कर्जरोखे उभारण्याचे स्थायी समितीत पडसाद, श्वेत पत्रिका काढण्याची सर्वपक्षीयांची मागणी - मुंबई महापालिका स्थायी समिती
मुंबई पालिका चार हजार कोंटीचे कर्जरोख्यातून निधी उभारला जाणार आहे. कर्जरोखे उभारण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. याचे पडसाद आज स्थायी समितीच्या बैठकीत उमटले. सर्वपक्षीय सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरत आर्थिक परिस्थितीबाबत श्वेतपत्रिका काढण्याची मागणी नगरसेवकांनी लावून धरली.
आर्थिक स्थितीचा खुलासा करा -
महापालिकेच्या विविध बॅंकामध्ये ८० हजार कोटींच्या ठेवी आहेत. तरीही शेअर बाजारात सुमारे चार हजार कोंटीचे कर्ज रोखे उभारणार आहे. स्थायी समिती, गटनेते, लोकप्रतिनिधी याबाबत अनभिन्न आहेत. कोरोनाच्या नावाखाली कोट्यवधींचा निधी वापरला. आता महसूल घटल्याचे सांगत कर्ज रोखे उभारण्याचा घाट घातला जातो आहे. या सर्व प्रकरणाचा खुलासा करुन मनपाच्या अर्थसंकल्पातील तरतूदी, खर्च, ठेवी आदी आर्थिक स्थितीचा खुलासा करावा, असा हरकतीचा मुद्दा सपाचे पालिकेतील गटनेते रईस शेख यांनी केला.