महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Mumbai Teachers Vacancies : मुंबई महापालिका मराठी भाषिक शाळेत शिक्षकांच्या 20 टक्के जागा रिक्त - mumbai corporation marathi school 20 percentage vacancies

मुंबई महापालिकेने ४ जुलै २०२२ रोजी शिक्षकांचे समायोजन करण्याचा आदेश जारी केला ( Mumbai Teachers Vacancies ) आहे. त्यामध्ये मराठी भाषिक शाळेत २० टक्के तर इंग्रजी भाषिक शाळेत ३० टक्के आणि कन्नड भाषिक शाळेत २५ टक्के शिक्षक पदे रिक्त ( mumbai corporation marathi school 20 percentage vacancies ) आहेत.

mumbai corporation
mumbai corporation

By

Published : Jul 17, 2022, 8:44 PM IST

मुंबई -मुंबई महापालिकेने ४ जुलै २०२२ रोजी शिक्षकांचे समायोजन करण्याचा आदेश जारी केला ( Mumbai Teachers Vacancies ) आहे. या आदेशाने मनपा शाळेत शिक्षकांची जागा रिकामी होणार आहे. त्यामुळे बालकांना शिक्षणाच्या हक्काची हमी कशी मिळणार, असा सवाल शिक्षकांनी केला आहे.

मुंबई महापालिकेने मराठी भाषिक शाळेत २० टक्के ( mumbai corporation marathi school 20 percentage vacancies ) तर इंग्रजी भाषिक शाळेत ३० टक्के आणि कन्नड भाषिक शाळेत २५ टक्के शिक्षक पदे रिक्त ताज्या आदेशात म्हटले आहे. याबाबत महापालिकेत सत्तेत असेलल्या शिवसेना प्रणित शिक्षक संघटना त्यांनी देखील विरोध केला आहे.

मराठी १३६९, हिंदी १८९५, उर्दू १८७६, गुजराती ११०, तामिळ १०४, तेलगू २९, कन्नड १०५ तर इंग्रजी ९८० आणि एमपीएस अर्थात मुंबई पब्लिक स्कुल मध्ये ७५५ असे एकूण महापलिकेत ७,२२३ शिक्षक पदे आवश्यक आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने शिक्षकांची आवश्यकता असल्याचे दस्तुरखुद्द महापालिकाचा ४ जुलै २०२२ चा आदेश सुस्पष्ट नमूद करतो. तरीही मनपा शिक्षकांची पदे का भरत नाही?, असा प्रश्न शिक्षक संघटना करत आहेत.

उक्त आदेशात मराठीसाठी २० टक्के शिक्षकांची पदे रिकामी ठेवावीत. एमपीएस अर्थात मुंबई पब्लिक स्कुल मधील जिथे मनपा गाजावाजा करून इंग्रजीचे शिक्षण दर्जदार देते, असं सांगते. त्या शाळांमध्ये ३० टक्के शिक्षणाच्या जागा रिकाम्या ठेवा सांगत आहेत. तर मायबोली मराठीच्या शाळांमध्ये २० टक्के शिक्षकांची पदे रिकामी राहणार मग प्रश्न, असं उपस्थित होतो. एका मराठी शाळांमध्ये १० शिक्षक असतील तर २० टक्के प्रमाणाने त्यातील दोन शिक्षकांना दुसऱ्या कुठल्या तरी शाळेत पाठविले जाईल. मग या शाळेतील विद्यार्थ्यांना कोणी शिकवायचे?, असा तर्कसंगत सवाल शिक्षकांनी उपस्थित केला आहे. तो दुर्लक्षित करता येण्याजोगा नाही.

महापालिकेने दिलेल्या माहितीमध्ये, यंदा सुमारे ३ लाख ५० हजार विद्यार्थी पटावर आहेत. आर टी ई नुसार एका तुकडीसाठी ३० विद्यार्थी एक शिक्षक असे प्रमाण नमूद केले आहे. त्यानुसार ३ लाख ५० हजार विद्यार्थी करिता ११,१६६ शिक्षकांची गरज महापालिकेला आहे. सध्या महापालिकेत कार्यरत शिक्षक संख्या ६४३५ इतकी आहे. पटसंख्या वाढल्याने शिक्षक भरतीची नितांत आवश्यकता असल्याने महापालिका यावर किती गांभीर्याने निर्णय घेते ते येत्या काळात समजेल.

हेही वाचा -शिवसेनेला मोठा धक्का बसणार?, कोल्हापुरातील दोन्ही खासदार 'जय महाराष्ट्र' करण्याच्या तयारीत

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details