मुंबई - देशातील सर्वात श्रीमंत असणाऱ्या मुंबई महापालिकेचा 2022-23 या ( Mumbai Corporation Budget 2022 ) अर्थिक वर्षाचा 45,949.21 कोटींचा अर्थसंकल्प पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल ( Commissioner Iqbal Singh Chahal ) यांनी गुरुवारी स्थायी समितील सादर केला. पालिकेचा आतार्यंतचा हा सर्वांधिक रकमेचा अर्थसंकल्प असून, त्यात पायाभूत सुविधांवर भर देण्यात आला आहे.
आरोग्य सेवेसाठी 6933.75 कोटी
मुंबईत दोन वर्षे कोरोनाचा प्रसार आहे. या दरम्यान कोरोनाच्या तीन लाटा आल्या आहेत. यामुळे आरोग्य सेवा बळकट करण्याकडे पालिकेने लक्ष केंद्रित केले आहे. यासाठी मुंबई महापालिकेच्या २०२२-२३ च्या अर्थसंकल्पात तब्बल ६९३३.७५ कोटींची तरतूद केली आहे. येत्या वर्षात भांडुप येथे एक सुपर स्पेशालिटी रुग्णालय उभारले जाणार असून कांदिवली येथील डॉ. बाबासाहेब रुग्णालयात सुपर स्पेशालिटी विभाग सुरू करण्यात येणार आहे. तसेच प्रसूतीगृहांचा पुनर्विकास केला जाणार आहे
बेस्टसाठी 800 कोटी
मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळख असलेली बेस्ट आर्थिक संकटात आहे. बेस्टला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी पालिकेने आतापर्यंत ३,५०० कोटींची मदत केली आहे. तरीही बेस्ट उपक्रमाचा तोटा वाढत असळणे बेस्टला आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी पालिकेने सन २०२२ - २३ च्या अर्थसंकल्पात ८०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे.