मुंबई : शहरात मागील मार्च पासून कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. हा प्रादुर्भाव कमी होत असताना 16 जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली. मुंबईत आतापर्यंत आरोग्य कर्मचारी, फ्रंट लाईन वर्कर यांना लस देण्यात येत होती. 1 मार्चपासून 60 वर्षावरील जेष्ठ नागरिक आणि 45 वर्षावरील आजार असलेल्या नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात झाली. आज मुंबईत 42 हजार 740 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. आतापर्यंत एकूण 8 लाख 9 हजार 871 लाभार्थ्यांना लस देण्यात आली.
लसीकरणाची आकडेवारी..
मुंबईत शुक्रवारी 42 हजार 740 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. त्यातील 34 हजार 313 लाभार्थ्यांना पहिला तर 8 हजार 427 लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला. आतापर्यंत एकूण 8 लाख 9 हजार 871 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. त्यात 7 लाख 29 हजार 977 लाभार्थ्यांना पहिला तर 1 लाख 68 हजार 894 लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला. आतापर्यंत एकूण 2 लाख 12 हजार 950 आरोग्य कर्मचारी, 1 लाख 68 हजार 412 फ्रंटलाईन वर्कर, 3 लाख 73 हजार 189 जेष्ठ नागरिक तर 45 ते 59 वर्षामधील गंभीर आजार असलेल्या 55 हजार 320 लाभार्थ्यांना लस देण्यात आली.