मुंबई -आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून धारावीची ओळख आहे. या धारावीत आटोक्यात आलेल्या कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. मागील काही दिवसांपासून येथील कोरोना रुग्णांची आकडेवारी वाढत आहे. धारावीत आज(३ एप्रिल) ७४ नवे रुग्ण आढळून आल्याने सक्रिय रुग्णांची संख्या ७४२ वर गेली आहे. दादरमध्ये नवे ९२ रुग्ण आढळून आले असून सक्रिय रुग्णांची संख्या १०८३ वर तर माहीममध्ये १०५ नवे रुग्ण आढळून आल्याने सक्रिय रुग्णांची संख्या १२५९ वर पोहचली आहे.
धारावीत ७४२ अॅक्टिव्ह रुग्ण -
कोरोना धारावीतून हद्दपार होणार अशी स्थिती असतानाच फेब्रुवारीच्या मध्यापासून पुन्हा रुग्णसंख्या वाढू लागली आहे. २ फेब्रुवारीला मुंबईत दिवसभरात ३३४ रुग्ण आढळून आले होते. ही रुग्णसंख्या आज ३ एप्रिल रोजी ९०९० वर पोहचली आहे. धारावीतही काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. धारावीत ८ मार्चला दिवसभरात १८ रुग्ण आढळले होते. त्यानंतर सतत रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. १८ मार्चला ही रुग्णसंख्या ३० वर पोहचली होती. आज धारावीत ७४ नवे रुग्ण आढळून आले आहेत. धारावीत आतापर्यंत एकूण ५१३२ रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी ४०७३ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून ७४२ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
हेही वाचा -मुंबईत कोरोनावाढीचा नवा उच्चांक.. दिवसभरात 9 हजार 90 नवे रुग्ण, 27 रुग्णांचा मृत्यू