महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मुंबईत कोरोनाचे 477 नवे रुग्ण, 7 रुग्णांचा मृत्यू - मुंबई कोरोना रुग्ण न्यूज

मुंबईत सोमवारी 477 नवे रुग्ण आढळून आले असून 7 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

mumbai corona update
मुंबईत कोरोनाचे 477 नवे रुग्ण, 7 रुग्णांचा मृत्यू

By

Published : Dec 15, 2020, 3:54 AM IST

मुंबई - शहरात मार्चपासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरू झाला आहे. ऑगस्ट महिन्यात आलेल्या धार्मिक सणानंतर सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून रुग्णांचा संख्येत वाढ होत होती. ऑक्टोबर महिन्यापासून रुग्ण संख्या आटोक्यात आली. त्यानंतर पुन्हा रुग्ण संख्या वाढू लागली. 16 नोव्हेंबरला रुग्ण संख्या 409 पर्यंत खाली आली होती. गेले काही दिवस रुग्ण संख्येत वाढ झाली होती. मात्र आता पुन्हा रुग्णांच्या संख्येत घट होत आहे. सोमवारी मुंबईत 477 रुग्ण आढळून आले असून 7 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

रुग्ण, मृत्यूंची आकडेवारी -
मुंबईत सोमवारी कोरोनाचे 477 नवे रुग्ण आढळून आले असून 7 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी 6 रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. मुंबईमधील कोरोनाग्रस्तांचा आकडा 2 लाख 87 हजार 303 वर पोहचला आहे. तर, मृतांचा आकडा 10 हजार 988 वर पोहचला आहे. मुंबईमधून आज 533 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. मुंबईत डिस्चार्ज देण्यात आलेल्यांचा आकडा 2 लाख 66 हजार 695 वर गेला आहे. सध्या मुंबईत 9 हजार 068 सक्रिय रुग्ण आहेत.

रुग्ण दुप्पटीचा कालावधी 318 दिवसांवर -
मुंबईत कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 93 टक्क्यांवर पोहचले आहे. रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 327, दिवस तर सरासरी दर 0.21 टक्के आहे. मुंबईत सध्या कोरोनाचे रुग्ण आढळून आलेल्या 439 चाळी आणि झोपडपट्टी कंटेनमेंट झोन घोषित करून सील करण्यात आल्या आहेत. तसेच 4 हजार 924 इमारती व इमारतीच्या विंग, काही मजले सील करण्यात आले आहेत. तर, कोरोनाचे निदान करण्यासाठी 21 लाख 275 इतक्या चाचण्या करण्यात आल्या आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details