मुंबई - ऑगस्ट महिन्यातील धार्मिक सणानंतर सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून रुग्णांचा संख्येत वाढ होत होती. मात्र गेल्या काही दिवसात पुन्हा रुग्णांच्या संख्येत घट होत असल्याचे चित्र आहे. मुंबईत आज नव्या 574 रुग्णांची नोंद झाली असून 15 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या महिनाभरात रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 69 वरून 255 दिवस वाढल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
9 हजार 956 सक्रिय रुग्ण
मुंबईत आज (रविवारी) कोरोनाचे 574 नवे रुग्ण आढळून आले असून 15 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी 11 रुग्णांना दिर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये 10 पुरुष तर 5 महिला आहेत. मुंबईमधील कोरोनाग्रस्तांचा आकडा 2 लाख 69 हजार 704 वर पोहचला आहे. तर, मृतांचा आकडा 10 हजार 570 वर गेलाय. मुंबईतून आज 586 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. डिस्चार्ज देण्यात आलेल्यांचा एकूण आकडा 2 लाख 44 हजार 659 वर गेला आहे. सध्या मुंबईत 10 हजार 077 सक्रिय रुग्ण आहेत.