मुंबई -मुंबईत मार्चपासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आहे. गेल्या अकरा महिन्यात करण्यात आलेल्या उपाययोजनांमुळे कोरोना आटोक्यात आला होता. मुंबईत 300 ते 400 रुग्ण आढळून येत होते, मात्र फेब्रुवारी महिन्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. मुंबईत आता दिवसाकाठी 1 हजारांपेक्षाही अधिक कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. रविवारी 1360, सोमवारी 1008, मंगळवारी 1012 बुधवारी 1539 गुरुवारी 1508 तर आज सर्वाधिक 1646 रुग्ण आढळून आले आहेत. तर कोरोनामुळे 4 जणांचा मृत्यू झाला आहे.
कोरोना रुग्णांची आकडेवारी
मुंबईत आज 1646 रुग्ण आढळून आल्याने कोरोनाग्रस्तांचा आकडा 3 लाख 40 हजार 277 वर पोहोचला आहे. आज 4 जणांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 11 हजार 519 वर पोहोचला आहे. 1122 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने रुग्ण बरे होण्याची संख्या 3 लाख 15 हजार 379 वर पोहोचली आहे. मुंबईत सध्या 12 हजार 478 सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 93 टक्के असून, रुग्ण दुपटीचा कालावधी 196 दिवस इतका आहे. मुंबईत कोरोना रुग्ण आढळून आलेल्या 30 चाळी आणि झोपडपट्ट्या कंटेन्मेट झोन म्हणून घोषित केल्या आहेत. तर 214 इमारतीत रुग्ण आढळून आल्याने त्या इमारती सील करण्यात आल्या आहेत. कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी आतापर्यंत 35 लाख 16 हजार 875 चाचण्या करण्यात आल्या आहेत.
हे विभाग आहेत हॉटस्पॉट