मुंबई - मुंबईत मार्चपासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आहे. गेल्या अकरा महिन्यांत करण्यात आलेल्या उपाययोजनांमुळे कोरोना आटोक्यात आला होता. मुंबईत दररोज 300 ते 400 रुग्ण आढळून येत होते. मात्र फेब्रुवारी महिन्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. सलग तीन दिवस मुंबईत एक हजारांच्या वर कोरोना रुग्ण आढळून आले होते. त्यात काल काहीप्रमाणात घट झाली होती. आज पुन्हा रुग्णसंख्या एक हजाराच्या वर गेली आहे. आज मुंबईत 1051 नवे रुग्ण आढळून आले असून, 5 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.
कोरोना रुग्णांची आकडेवारी
मुंबईत आज 1051 रुग्ण आढळून आल्याने कोरोनाग्रस्तांचा आकडा 3 लाख 25 हजार 915 वर पोहोचला आहे. आज 5 जणांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 11 हजार 470 वर पोहोचला आहे. तर 827 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने रुग्ण बरे होण्याची संख्या 3 लाख 3 हजार 860 वर पोहोचली आहे. मुंबईत सध्या 9715 सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 93 टक्के असून, रुग्ण दुपटीचा कालावधी 245 दिवस इतका आहे. मुंबईत कोरोना रुग्ण आढळून आलेल्या 12 चाळी आणि झोपडपट्ट्या कंटेंनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. तर 133 इमारती रुग्ण आढळून आल्याने सील करण्यात आल्या आहेत. कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी आतापर्यंत 32 लाख 75 हजार 270 चाचण्या करण्यात आल्या आहेत. अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.
हे विभाग आहेत हॉटस्पॉट