मुंबई- मुंबईत डिसेंबर महिन्यापासून पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. पहिल्या लाटे दरम्यान २ हजार ८०० तर दुसऱ्या लाटेदरम्यान कोरोनाचे ११ हजार ५०० सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली होती. शनिवारी (८ जानेवारीला) (Mumbai Corona Update on 8th jan 2022 ) २० हजार ३१८ रुग्णांची नोंद झाली ( New Covid Patients in Mumbai ) आहे. पाच जणांचा मृत्यू झाला ( Death due to Corona ) आहे.
२० हजार ३१८ नव्या रुग्णांची नोंद -
मुंबईत आज (८ जानेवारीला) २० हजार ३१८ नवे रुग्ण आढळून आले ( Mumbai Corona Update ) आहेत. तर ५ मृत्यूची नोंद झाली आहे. आज ६ हजार ३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण ८ लाख ९५ हजार ९८ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी ७ लाख ७० हजार ५६ रुग्ण बरे झाले आहेत. तर १६ हजार ३९९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सक्रिय रुग्णांची संख्या १ लाख ६ हजार ३७ वर पोहोचली ( Active Corona Patients in Mumbai ) आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८६ टक्के तर रुग्ण दुपटीचा कालावधी ४७ दिवस इतका आहे. मुंबईमधील १२० इमारती आणि ९ झोपडपट्ट्या सील करण्यात आली आहे. १ जानेवारी ते ७ जानेवारी या कालावधीत कोरोना वाढीचा दर १.४७ टक्के इतका आहे.
७९ टक्के बेड रिक्त -
मुंबईत आज आढळून आलेल्या २० हजार ३१८ रुग्णांपैकी १६ हजार ६६१ म्हणजेच ८२ टक्के लक्षणे नसलेले रुग्ण आहेत. आज १ हजार २५७ रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागले. १०८ रुग्णांना ऑक्सिजन बेडची आवश्यकता भासली आहे. मुंबईत रुग्णालयांमध्ये ३३ हजार ८०३ बेड्स असून त्यापैकी ७ हजार २३४ बेड्सवर म्हणजेच २१ टक्के बेडवर रुग्ण आहेत. इतर ७९ टक्के बेड रिक्त आहेत.
अशी वाढली रुग्णसंख्या -
मुंबईत गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण आढळून आला. तेव्हापासून मुंबईत कोरोनाचा प्रसार आहे. फेब्रुवारी महिन्यात दुसरी लाट आली. एप्रिल महिन्यात रुग्णसंख्या ११ हजारावर गेली होती. जूनपासून त्यात घट होऊ लागली. १ डिसेंबरला कोरोनाचे १०८ नवे रुग्ण आढळून आले होते. २ डिसेंबरला त्यात वाढ होऊन २२८ रुग्ण आढळून आले. १७ डिसेंबरला २९५, १९ डिसेंबरला ३३६, २२ डिसेंबरला ४९०, २३ डिसेंबरला ६०२, २४ डिसेंबरला ६८३, २५ डिसेंबर ७५७, २६ डिसेंबर ९२२, २७ डिसेंबरला ८०९, २८ डिसेंबरला १ हजार ३७७, २९ डिसेंबरला २ हजार ५१०, ३० डिसेंबर ३ हजार ६७१, ३१ डिसेंबरला ५ हजार ६३१, १ जानेवारीला ६ हजार ३४७, २ जानेवारीला ८ हजार ६३, ३ जानेवारीला ८ हजार ८२, ४ जानेवारीला १० हजार ८६०, ५ जानेवारीला १५ हजार १६६, ६ जानेवारीला २० हजार १८१, ७ जानेवारीला २० हजार ९७१, ८ जानेवारीला २० हजार ३१८ नवीन रुग्ण आढळून आले आहेत.
नऊ वेळा शून्य मृत्यूची नोंद -
मुंबईमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर गेल्या काही महिन्यात १ ते ६ मृत्यूंची नोंद झाली होती. १७ ऑक्टोंबर २०२१ रोजी शून्य मृत्युची नोंद झालेली आहे. त्यानंतर ११ डिसेंबर, १५ डिसेंबर, १८ डिसेंबर, २० डिसेंबर, २२ डिसेंबर, २५ डिसेंबर, ३० डिसेंबरला, २ जानेवारीला शून्य मृत्यूची नोंद झाली आहे.
धारावीत १४७ रुग्ण -
मुंबईतील धारावी ( Dharavi Corona Update ) ही सर्वात मोठी झोपडपट्टी कोरोनाच्या पहिल्या लाटेदरम्यान हॉटस्पॉट ठरली होती. पहिल्या लाटे दरम्यान सर्वाधिक ९४, तर दुसऱ्या लाटेदरम्यान ९९ रुग्ण आढळून आले होते. धारावीत गेले काही महिने कोरोनाचे १ ते ५ रुग्ण आढळून येत होते. मात्र मुंबईत रुग्णसंख्या वाढू लागल्यावर धारावीतही रुग्णसंख्या वाढू लागली आहे. धारावीत ३० डिसेंबरला २०, ३१ डिसेंबरला ३४, १ जानेवारीला २४, २ जानेवारीला ६०, ३ जानेवारीला ४१, ४ जानेवारीला ४०, ५ जानेवारीला ८१, ६ जानेवारीला १०७, ७ जानेवारीला १५०, ८ जानेवारीला १४७ रुग्णांची नोंद झाली आहे. धारावीत एकूण ७९२३ रुग्ण असून ६ हजार ७७७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. धारावीत सध्या ७२९ सक्रिय रुग्ण आहेत. त्यापैकी १८३ रुग्णांना लक्षणे असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर ५४६ लक्षणे नसलेल्या रुग्णांना होम आणि संस्थात्मक विलगिकरणात आहेत.
हेही वाचा -मंत्री एकनाथ शिंदे यांना रुग्णालयातून डिस्चार्ज.. रुग्णायालातून घेतला कोरोना परिस्थितीचा आढावा