मुंबई - मुंबईत कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होताना दिसत आहे. आज शुक्रवारी मुंबईत (25 फेब्रुवारी) १२८ रुग्णांची नोंद झाली (Mumbai Corona Update) आहे. तसेच आज शून्य मृत्यूची नोंद (Zero Corona Death Today) झाली आहे. आतापर्यंत मुंबईत एकूण १५ वेळा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. मुंबईत सध्या रुग्ण बरे होण्याचा दर ९८ टक्के असून १०१४ सक्रिय रुग्ण आहेत.
मुंबईत डिसेंबर महिन्यापासून कोरोना विषाणूची तिसरी लाट आली. जानेवारीच्या सुरुवातीला ६ ते ८ जानेवारीदरम्यान सलग तीन दिवस २० हजारच्यावर रुग्ण आढळून आले. त्यानंतर रुग्णसंख्येत घट होऊन २०० ते ३०० रुग्ण आढळून येत होते. सोमवारी त्यात घट होऊन ९६ रुग्णांची नोंद झाली होती.
१२८ नव्या रुग्णांची नोंद -
मुंबईत गेले दोन वर्षे कोरोनाचा प्रसार आहे. या दरम्यान कोरोनाच्या दोन लाटा आल्या. त्या दोन्ही लाटा थोपवण्यात पालिकेला यश आले आहे. पहिल्या लाटे दरम्यान २८०० तर दुसऱ्या लाटेदरम्यान कोरोनाचे ११ हजार ५०० सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली होती. डिसेंबर महिन्यात कोरोनाची तिसरी लाट आली असून ६ ते ८ जानेवारीदरम्यान सलग तीन दिवस २० हजारच्यावर रुग्ण आढळून आले. त्यानंतर रुग्णसंख्येत घट होताना दिसत आहे.
मुंबईत आज (२५ फेब्रुवारीला) १२८ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. आज २०० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण १० लाख ५६ हजार २०७ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी १० लाख ३५ हजार ६२६ रुग्ण बरे झाले आहेत. तर १६ हजार ६९१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या १०१४ सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८ टक्के तर रुग्ण दुपटीचा कालावधी ४२३८ दिवस इतका आहे. मुंबईत एकही इमारत झोपडपट्टी सील नाही. १८ फेब्रुवारी ते २४ फेब्रुवारी या कालावधीत कोरोना वाढीचा दर ०.०२ टक्के इतका आहे.