मुंबई:मुंबईत गेल्या २४ तासात ११ हजार २४० चाचण्या करण्यात आल्या. त्यात ३३९ नवे रुग्ण आढळून आले ( Mumbai Corona Update ) आहेत. चाचण्यांच्या प्रमाणात ३.०१ टक्के रुग्ण पॉजिटीव्ह आढळून आले आहेत. आज शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. ५३८ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण ११ लाख २० हजार १७२ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी १० लाख ९७ हजार ७४० रुग्ण बरे झाले आहेत. तर १९ हजार ६२७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या २ हजार ८०५ सक्रिय रुग्ण ( Active Corona Patients ) आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८ टक्के तर रुग्ण दुपटीचा कालावधी १८३६ दिवस इतका आहे. गेल्या आठवडाभरातातील कोरोना वाढीचा दर ०.०३७ टक्के इतका आहे.
रुग्णसंख्या स्थिर :मुंबईत गेले दोन वर्षे कोरोनाचा प्रसार आहे. या दरम्यान कोरोनाच्या दोन लाटा आल्या. त्या दोन्ही लाटा थोपवण्यात पालिकेला यश आले आहे. पहिल्या लाटे दरम्यान २ हजार ८०० तर दुसऱ्या लाटेदरम्यान कोरोनाचे ११ हजार ५०० सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली होती. डिसेंबर महिन्यात कोरोनाची तिसरी लाट आली असून ६ ते ८ जानेवारीदरम्यान सलग तीन दिवस २० हजाराच्यावर रुग्ण आढळून आले. त्यानंतर रुग्णसंख्येत घट
झाली. मार्च एप्रिल महिन्यात रुग्णसंख्या ५० च्या खाली आली होती.