मुंबई - मुंबईत ( Mumbai Corona Update ) डिसेंबर महिन्यापासून कोरोना विषाणूची तिसरी लाट आली आहे. जानेवारीच्या सुरुवातीला ६ ते ८ जानेवारीदरम्यान सलग तीन दिवस २० हजारच्यावर रुग्ण आढळून आले. त्यानंतर रुग्णसंख्येत घट होऊन २०० ते ३०० रुग्ण आढळून येत होते. त्यात घट होऊन मागील सोमवारी ९६, शनिवारी ८९, काल सोमवारी ७३ तर आज ७७ रुग्णांची नोंद ( new 77 corona patient Found in Mumbai ) झाली आहे. आज शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण १९ वेळा तर फेब्रुवारी महिन्यात १० वेळा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. मुंबईत सध्या रुग्ण बरे होण्याचा दर ९८ टक्के असून ७६७ सक्रिय रुग्ण आहेत.
७७ नव्या रुग्णांची नोंद -
मुंबईत गेले दोन वर्षे कोरोनाचा प्रसार आहे. या दरम्यान कोरोनाच्या दोन लाटा आल्या. त्या दोन्ही लाटा थोपवण्यात पालिकेला यश आले आहे. पहिल्या लाटे दरम्यान २८०० तर दुसऱ्या लाटेदरम्यान कोरोनाचे ११ हजार ५०० सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली होती. डिसेंबर महिन्यात कोरोनाची तिसरी लाट आली असून ६ ते ८ जानेवारीदरम्यान सलग तीन दिवस २० हजारच्यावर रुग्ण आढळून आले. त्यानंतर रुग्णसंख्येत घट होताना दिसत आहे. मुंबईत आज (१ मार्च) ७७ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. आज १३५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण १० लाख ५६ हजार ५४९ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी १० लाख ३६ हजार २२१ रुग्ण बरे झाले आहेत. तर १६ हजार ६९१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या ७५७ सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८ टक्के तर रुग्ण दुपटीचा कालावधी ५२७९ दिवस इतका आहे. मुंबईत एकही इमारत झोपडपट्टी सील नाही. २२ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी या कालावधीत कोरोना वाढीचा दर ०.०१ टक्के इतका आहे.
९८.१ टक्के बेड रिक्त -