मुंबई -मुंबईत मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून कोरोना विषाणूच्या रुग्णसंख्येत पुन्हा वाढ होऊ लागली आहे. गेले काही दिवस २ हजारावर रुग्ण आढळून आले. त्यानंतर चाचण्यांची संख्या कमी केल्याने कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होऊ लागली आहे. आज ( 3 जुलै ) सलग तिसऱ्या दिवशी एक हजाराच्या खाली रुग्णसंख्या नोंद झाली आहे. आज ७६१ रुग्णांची नोंद झाली ( Mumbai Sees 761 Corona Cases ) आहे. तसेच, ३ जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत सध्या ४९१ बेडवर रुग्ण असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
६.६१ टक्के रुग्ण पॉजिटीव्ह -मुंबईत कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी पालिका आयुक्तांनी चाचण्या वाढवण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार मुंबईत गेल्या २४ तासात ११ हजार ५०० चाचण्या करण्यात आल्या. त्यात ७६१ नवे रुग्ण आढळून आले ( Mumbai Corona Update ) आहेत. चाचण्यांच्या प्रमाणात ६.६१ टक्के रुग्ण पॉजिटीव्ह आढळून आले आहेत. आज ३ मृत्यूची नोंद झाली आहे. १६९७ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण ११ लाख १५ हजार ०४२ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी १० लाख ८७ हजार ७५४ रुग्ण बरे झाले आहेत. तर १९ हजार ६१७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या ७ हजार ६७१ सक्रिय रुग्ण ( Active Corona Patients ) आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८ टक्के तर रुग्ण दुपटीचा कालावधी ५८४ दिवस इतका आहे. मुंबईत एकही इमारत झोपडपट्टी सील नाही. गेल्या आठवडाभरातातील कोरोना वाढीचा दर ०.११३ टक्के इतका आहे.
१८ रुग्ण व्हेंटिलेटरवर -मुंबईत आज आढळून आलेल्या ८११ रुग्णांपैकी ७५५ म्हणजेच ९३ टक्के लक्षणे नसलेले रुग्ण आहेत. मुंबईत रुग्णालयांमध्ये २४ हजार ८२७ बेड्स असून, त्यापैकी ५३२ बेडवर रुग्ण आहेत. ५० रुग्ण ऑक्सिजनवर, ११३ रुग्ण आयसीयूमध्ये तर १८ रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.