महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Mumbai Corona Update : मुंबईत कोरोनाचा धोका वाढतोय; सलग दुसऱ्या दिवशी रुग्णवाढ

मुंबईत आज ( 4 मे ) ११७ रुग्णांची नोंद ( Mumbai Corona Update ) झाली आहे. तर, शून्य मृत्यूची नोंद ( Mumbai Corona Death ) झाली आहे.

Mumbai Corona Update
Mumbai Corona Update

By

Published : May 4, 2022, 8:31 PM IST

मुंबई -मुंबईत कोरोना विषाणूची तिसरी लाट ( Third Wave Corona Virus ) आटोक्यात आली आहे. यामुळे रुग्णसंख्येत घट ( Corona Cases Decreases ) होऊन गेले काही दिवस ५० च्या आत रुग्ण आढळून येत होते. त्यात वाढ होऊन २६ एप्रिलला १०२ तर २७ एप्रिलला ११२ रुग्णांची नोंद झाली. त्यानंतर रुग्णसंख्येत घट झाली होती. काल ( मंगळवारी ) १०० रुग्णांची नोंद झाली. आज ( 4 मे ) त्यात किंचित वाढ होऊन ११७ रुग्णांची नोंद झाली आहे. आज शून्य मृत्यूची नोंद ( Mumbai Corona Death ) झाली आहे. मुंबईत सध्या रुग्ण बरे होण्याचा दर ९८ टक्के असून, ६४२ सक्रिय रुग्ण ( Mumbai Corona Active Cases ) आहेत.


११७ नवे रुग्ण - मुंबईत आज ( बुधवारी ) ११७ नवे रुग्ण आढळून आले ( Mumbai Corona Update ) आहेत. तर शून्य मृत्यूची नोंद ( Mumbai Corona Death ) झाली आहे. आज ११२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला ( Mumbai Corona Patient Discharged ) आहे. आतापर्यंत एकूण १० लाख ६० हजार १८७ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी १० लाख ३९ हजार ९८२ रुग्ण बरे झाले आहेत. तर, १९ हजार ५६३ रुग्णांचा मृत्यू झाला( Mumbai Corona Death ) आहे. सध्या ६४२ सक्रिय रुग्ण ( Mumbai Corona Active Cases ) आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८ टक्के, तर रुग्ण दुपटीचा कालावधी ८००३ दिवस इतका आहे. मुंबईत एकही इमारत झोपडपट्टी सील नाही. गेल्या आठवडाभरातातील कोरोना वाढीचा दर ०.००८ टक्के इतका आहे. मुंबईत आज आढळून आलेल्या ११७ रुग्णांपैकी ११४ म्हणजेच ९७ टक्के लक्षणे नसलेले रुग्ण आहेत. मुंबईत रुग्णालयांमध्ये २६ हजार ००९ बेड्स असून, त्यापैकी १५ बेडवर रुग्ण आहेत. मुंबईत ९९ टक्क्याहुन अधिक बेड रिक्त आहेत.

रुग्णसंख्येत चढउतार -मुंबईत गेले दोन वर्षे कोरोनाचा प्रसार आहे. या दरम्यान कोरोनाच्या दोन लाटा आल्या. त्या दोन्ही लाटा थोपवण्यात पालिकेला यश आले आहे. पहिल्या लाटे दरम्यान २ हजार ८०० तर दुसऱ्या लाटेदरम्यान कोरोनाचे ११ हजार ५०० सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली होती. डिसेंबर महिन्यात कोरोनाची तिसरी लाट आली असून, ६ ते ८ जानेवारीदरम्यान सलग तीन दिवस २० हजाराच्यावर रुग्ण आढळून आले. त्यानंतर रुग्णसंख्येत घट होताना दिसत आहे. १९ मार्चला २९, २० मार्चला २७, २१ मार्चला २८, २२ मार्चला २६, २४ मार्चला ५४, ३१ मार्चला ४२, १ एप्रिलला ३२, २ एप्रिलला ४९, ३ एप्रिलला ३५, ४ एप्रिलला १८, ५ एप्रिलला ५६, ६ एप्रिलला ५१, ७ एप्रिलला ४१, ८ एप्रिलला ४९, ९ एप्रिलला ५५, १० एप्रिलला ३५, ११ एप्रिलला २६, १२ एप्रिलला ५२, १३ एप्रिलला ७३, १४ एप्रिलला ५६, १५ एप्रिलला ४४, १६ एप्रिलला ४३, १७ एप्रिलला ५५, १८ एप्रिलला ३४, १९ एप्रिलला ८५, २० एप्रिलला ९८, २१ एप्रिलला ९१, २२ एप्रिलला ६८, २३ एप्रिलला ७२, २४ एप्रिलला ७३, २५ एप्रिलला ४५, २६ एप्रिलला १०२, २७ एप्रिलला ११२, २८ एप्रिलला ९०, २९ एप्रिलला ९३, ३० एप्रिलला ९४, १ मे ला ९२, २ मे ला ५६, ३ मे ला १००, ४ मे ला ११७ रुग्णांची नोंद झाली आहे.

७५ वेळा शून्य मृत्यूची नोंद - मुंबईमध्ये १७ ऑक्टोबर २०२१ रोजी पहिल्यांदा शून्य मृत्यूची नोंद झाली. त्यानंतर आतापर्यंत एकूण ७५ वेळा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. फेब्रुवारी महिन्यात ८ वेळा तर मार्च महिन्यात २७ वेळा, एप्रिल महिन्यात २६ वेळा तर मे महिन्यात ४ वेळा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे.

हेही वाचा -Devendra Fadnavis : 'मुख्यमंत्री ठाकरे आणि माझ्या बायकोत एकच साम्य...'; फडणवीसांचे मिश्कील उत्तर

ABOUT THE AUTHOR

...view details