मुंबई - मुंबईत शनिवारी (दि. 12 फेब्रुवारी) 349 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ ( Mumbai Corona Update ) झाली असून तिघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. मुंबईत सध्या 2 हजार 925 सक्रिय रुग्ण ( Active Corona Cases in Mumbai ) असून त्यांच्यावर विविध ठिकाणी उपचार सुरू ( Corona Patients in Mumbai ) आहेत.
२ हजार ९२५ सक्रिय रुग्ण: मुंबईत मागील दोन वर्षे कोरोनाचा प्रसार आहे. या दरम्यान कोरोनाच्या दोन लाटा आल्या. त्या दोन्ही लाटा थोपवण्यात पालिकेला यश आले आहे. पहिल्या लाटे दरम्यान २ हजार ८०० तर दुसऱ्या लाटेदरम्यान कोरोनाचे ११ हजार ५०० सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली होती. डिसेंबर महिन्यात कोरोनाची तिसरी लाट आली असून ६ ते ८ जानेवारीदरम्यान सलग तीन दिवस २० हजारांच्यावर रुग्ण आढळून आले. त्यानंतर रुग्णसंख्येत घट होताना दिसत आहे. मुंबईत आज ( १२ फेब्रुवारी ) ३४९ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर ३ मृत्यूची नोंद झाली आहे. आज ६३५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण १० लाख ५३ हजार ७६२ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी १० लाख ३१ हजार ३०४ रुग्ण बरे झाले आहेत. तर १६ हजार ६८२ रुग्णांचा मृत्यू झाला ( Death From Corona ) आहे. सध्या २ हजार ९२५ सक्रिय रुग्ण ( Active Corona Patients in Mumbai ) आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८ टक्के इतका आहे. मुंबईत एकही इमारत झोपडपट्टी सील नाही. ५ फेब्रुवारी ते ११ फेब्रुवारी या कालावधीत कोरोना वाढीचा दर ०.०६ टक्के इतका आहे.