मुंबई- मुंबईत डिसेंबर महिन्यापासून कोरोना विषाणूची तिसरी लाट आली आहे. जानेवारीच्या सुरुवातीला ६ ते ८ जानेवारीदरम्यान सलग तीन दिवस २० हजारांच्यावर रुग्ण आढळून आले. गुरुवारी (दि. १० फेब्रुवारी) नव्या ४२९ रुग्णांची नोंद झाली ( Mumbai Corona Update ) असून दोन मृत्यूची नोंद झाली आहे. मुंबईत सध्या ३ हजार ६९८ सक्रिय रुग्ण ( Active Corona Cases in Mumbai ) आहेत. रुग्ण बरे होण्याचा दर ९८ टक्के आहे.
पहिल्या लाटे दरम्यान २ हजार ८०० तर दुसऱ्या लाटेदरम्यान कोरोनाचे ११ हजार ५०० सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली होती. डिसेंबर महिन्यात कोरोनाची तिसरी लाट आली असून ६ ते ८ जानेवारी दरम्यान सलग तीन दिवस २० हजारांच्यावर रुग्ण आढळून आले. त्यानंतर रुग्णसंख्येत घट होताना दिसत आहे. मुंबईत आज (१० फेब्रुवारी) ४२९ नवे रुग्ण आढळून आले आहेत तर २ मृत्यूची नोंद झाली आहे. आज ८२२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण १० लाख ५३ हजार ४६ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी १० लाख २९ हजार ८३८ रुग्ण बरे झाले आहेत. १६ हजार ६७८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या ३ हजार ६९८ सक्रिय रुग्ण ( Active Cases In Mumbai ) आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८ टक्के तर रुग्ण दुपटीचा कालावधी ९४९ दिवस इतका आहे. मुंबईत एकही इमारत झोपडपट्टी सील नाही. ३ फेब्रुवारी ते ९ फेब्रुवारी या कालावधीत कोरोना वाढीचा ( Corona Rate in Maharashtra ) दर ०.०७ टक्के इतका आहे.
९६.८ टक्के बेड रिक्त -मुंबईत आज आढळून आलेल्या ४३९ रुग्णांपैकी ३५६ म्हणजेच ८३ टक्के लक्षणे नसलेले रुग्ण आहेत. आज ७१ रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागले. २० रुग्णांना ऑक्सिजन बेडची ( Oxygen Beds in Mumbai ) गरज भासली आहे. मुंबईत रुग्णालयांमध्ये ३६ हजार ९७७ बेड्स असून त्यापैकी १ हजार १८८ बेड्सवर म्हणजेच ३.२ टक्के बेडवर रुग्ण आहेत. इतर ९६.८ टक्के बेड रिक्त ( Available Covid Beds in Mumbai ) आहेत.