मुंबई- मुंबईत डिसेंबर महिन्यापासून पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. आज ( दि. १३ जानेवारी ) १३ हजार ७०२ नव्या रुग्णांची नोंद ( Corona Patients in Mumbai ) झाली असून सहा जणांचा कोरोनामुळे उपचारादरम्यान मृत्यू ( Death by Corona ) झाला आहे. यामुळे मुंबईत रुग्णसंख्येत चढउतार पाहायला मिळत आहे. मुंबईत सध्या ९५ हजार १२३ सक्रिय रुग्ण ( Active Corona Cases in Mumbai ) आहेत.
२० हजार ८४९ रुग्णांना डिस्चार्ज -मुंबईत आज (१३ जानेवारीला) १३ हजार ७०२ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर ६ मृत्यूची नोंद झाली आहे. आज २० हजार ८४९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला ( Recover From Corona ) आहे. आतापर्यंत एकूण ९ लाख ६९ हजार ९८९ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी ८ लाख ५५ हजार ८११ रुग्ण बरे झाले आहेत. तर १६ हजार ४२६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सक्रिय रुग्णांची संख्या ९५ हजार १२३ वर पोहोचली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८८ टक्के तर रुग्ण दुपटीचा कालावधी ३६ दिवस इतका आहे. मुंबईमधील ६१ इमारती सील आहेत. ६ जानेवारी ते १२ जानेवारी या कालावधीत कोरोना वाढीचा दर १.८५ टक्के इतका आहे.
८२.७ टक्के बेड रिक्त -मुंबईत आज आढळून आलेल्या १३ हजार ७०२ रुग्णांपैकी ११ हजार ५१० म्हणजेच ८४ टक्के लक्षणे नसलेले रुग्ण आहेत. आज ८७१ रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागले. १२७ रुग्णांना ऑक्सिजन बेडची ( Oxygen Beds in Mumbai ) आवश्यकता भासली आहे. मुंबईत रुग्णालयांमध्ये ३६ हजार ९७९ बेडस असून त्यापैकी ६ हजार ४१० बेडवर म्हणजेच १७.३ टक्के बेडवर रुग्ण आहेत. इतर ८२.७ टक्के बेड रिक्त ( Available Beds in Mumbai ) आहेत.
अशी वाढली रुग्णसंख्या -मागील वर्षीफेब्रुवारी महिन्यात दुसरी लाट आली. एप्रिल महिन्यात रुग्णसंख्या ११ हजारांवर गेली होती. जूनपासून त्यात घट होऊ लागली. १ डिसेंबरला कोरोनाचे १०८ नवे रुग्ण आढळून आले होते. २ डिसेंबरला त्यात वाढ होऊन २२८ रुग्ण आढळून आले. १७ डिसेंबरला २९५, १९ डिसेंबरला ३३६, २२ डिसेंबरला ४९०, २३ डिसेंबरला ६०२, २४ डिसेंबरला ६८३, २५ डिसेंबर ७५७, २६ डिसेंबर ९२२, २७ डिसेंबरला ८०९, २८ डिसेंबरला १ हजार ३७७, २९ डिसेंबरला २ हजार ५१०, ३० डिसेंबर ३ हजार ६७१, ३१ डिसेंबरला ५ हजार ६३१, १ जानेवारीला ६ हजार ३४७, २ जानेवारीला ८ हजार ६३, ३ जानेवारीला ८ हजार ८२, ४ जानेवारीला १० हजार ८६०, ५ जानेवारीला १५ हजार १६६, ६ जानेवारीला २० हजार १८१, ७ जानेवारीला २० हजार ९७१, ८ जानेवारीला २० हजार ३१८, त्यानंतर रुग्णसंख्या घटली असून ९ जानेवारीला १९ हजार ४७४, १० जानेवारीला १३ हजार ६४८, ११ जानेवारीला ११ हजार ६४७, १२ जानेवारीला १६ हजार ४२०, १३ जानेवारीला १३ हजार ७०२ नवीन रुग्ण आढळून आले आहेत.