मुंबई:मुंबईत ३१ ऑगस्टरोजी ८७३४ चाचण्या करण्यात आल्या. त्यात ६३८ रुग्णांची तर ४ मृत्यूची नोंद झाली आहे. ७८९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ११ लाख ४४ हजार ८२३ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी ११ लाख २० हजार ८६८ रुग्ण बरे झाले आहेत. तर १९ हजार ६९८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या ४२५७ सक्रिय रुग्ण Active Corona Patients आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.९ टक्के तर रुग्ण दुपटीचा कालावधी १२६० दिवस इतका आहे. मुंबईत एकही इमारत झोपडपट्टी सील नाही. गेल्या आठवडाभरातातील कोरोना वाढीचा दर ०.०५५ टक्के इतका आहे.
रुग्णसंख्येत वाढमुंबईत गेले दोन वर्षे कोरोनाचा प्रसार आहे. या दरम्यान कोरोनाच्या दोन लाटा आल्या. त्या दोन्ही लाटा थोपवण्यात पालिकेला यश आले आहे. पहिल्या लाटे दरम्यान २ हजार ८०० तर दुसऱ्या लाटेदरम्यान कोरोनाचे ११ हजार ५०० सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली होती. डिसेंबर महिन्यात कोरोनाची तिसरी लाट आली असून ६ ते ८ जानेवारीदरम्यान सलग तीन दिवस २० हजाराच्यावर रुग्ण आढळून आले. त्यानंतर रुग्णसंख्येत घट
झाली. मार्च एप्रिल महिन्यात रुग्णसंख्या ५० च्या खाली आली होती. मे महिन्यात रुग्णसंख्या १०० च्या वर गेली. जून महिन्यात रुग्णसंख्या वाढून २३ जूनला २४७९ रुग्णांची नोंद झाली. त्यानंतर त्यात घट होऊन १८ जुलैला १६७ रुग्णांची नोंद झाली. त्यानंतर रुग्णसंख्येत वाढ होऊ लागली.