महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Mumbai Corona Update : मुंबईकरांच्या चिंतेत वाढ; कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ

मुंबईत आज बुधवारी १९४ नवे रुग्ण आढळून आले ( Mumbai Corona Update ) आहेत. तर शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. आज १२४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण १० लाख ६२ हजार ०४० रुग्णांची नोंद झाली आहे.

Mumbai Corona Update
मुंबई कोरोना अपडेट

By

Published : May 18, 2022, 7:13 PM IST

मुंबई - मुंबईत कोरोना विषाणूची तिसरी लाट ( third wave of corona virus ) आटोक्यात आल्यामुळे रुग्णसंख्येत घट ( Decrease in patients ) होऊन गेले काही दिवस ५० च्या आत रुग्ण आढळून येत होते. त्यात गेल्या काही दिवसात वाढ होऊन १०० च्या वर रुग्णसंख्या नोंद होत आहे. आज बुधवारी १९४ नव्या रुग्णांची तर शून्य मृत्यूची नोंद ( deaths ) झाली आहे. मुंबईत सध्या रुग्ण बरे होण्याचा दर ९८ टक्के असून १००२ सक्रिय रुग्ण ( Active Corona Patients ) आहेत.

१९४ नवे रुग्ण -मुंबईत आज बुधवारी १९४ नवे रुग्ण आढळून आले ( Mumbai Corona Update ) आहेत. तर शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. आज १२४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण १० लाख ६२ हजार ०४० रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी १० लाख ४१ हजार ४७२ रुग्ण बरे झाले आहेत. तर १९ हजार ५६६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या १००२ सक्रिय रुग्ण ( Active Corona Patients in Mumbai ) आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८ टक्के तर रुग्ण दुपटीचा कालावधी ५४५० दिवस इतका आहे. मुंबईत एकही इमारत झोपडपट्टी सील नाही. गेल्या आठवडाभरातील कोरोना वाढीचा दर ०.०१२ टक्के इतका आहे. मुंबईत आज आढळून आलेल्या १९४ रुग्णांपैकी १८८ म्हणजेच ९७ टक्के लक्षणे नसलेले रुग्ण आहेत. मुंबईत रुग्णालयांमध्ये २४ हजार ९४४ बेड्स असून त्यापैकी २९ बेडवर रुग्ण आहेत. मुंबईत ९९ टक्क्याहुन अधिक बेड रिक्त आहेत.

रुग्णसंख्येत चढउतार -मुंबईत गेले दोन वर्षे कोरोनाचा प्रसार आहे. या दरम्यान कोरोनाच्या तीन लाटा आल्या. त्या तिन्ही लाटा थोपवण्यात पालिकेला यश आले आहे. पहिल्या लाटे दरम्यान २ हजार ८०० तर दुसऱ्या लाटेदरम्यान कोरोनाचे ११ हजार ५०० सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली होती. डिसेंबर महिन्यात कोरोनाची तिसरी लाट आली असून ६ ते ८ जानेवारीदरम्यान सलग तीन दिवस २० हजाराच्यावर रुग्ण आढळून आले. त्यानंतर रुग्णसंख्येत घट झाली. मार्च एप्रिल महिन्यात रुग्णसंख्या ५० च्या खाली आली होती. मे महिन्यात रुग्णसंख्या पुन्हा १०० च्या वर गेली आहे. ३ मे ला १००, ४ मे ला ११७, ५ मे ला १३०, ६ मे ला ११७, ७ मे ला १७२, ८ मे ला १२३, ९ मे ला ६३, १० मे ला १२२, ११ मे ला १२४, १२ मे ला १३९, १३ मे ला १५५, १४ मे ला १३१, १५ मे ला १५१, १७ मे ला १५८, १८ मे ला १९४ रुग्णांची नोंद झाली आहे.

८६ वेळा शून्य मृत्यूची नोंद -मुंबईमध्ये १७ ऑक्टोबर २०२१ रोजी पहिल्यांदा शून्य मृत्यूची नोंद झाली. त्यानंतर आतापर्यंत एकूण ८६ वेळा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. फेब्रुवारी महिन्यात ८ वेळा तर मार्च महिन्यात २७ वेळा, एप्रिल महिन्यात २६ वेळा तर मे महिन्यात १५ वेळा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे.

हेही वाचा -Maharashtra OBC Reservation : 'या' कारणामुळे महाराष्ट्र ओबीसी आरक्षणापासून वंचित, वाचा सविस्तर....

ABOUT THE AUTHOR

...view details