महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Mumbai Corona Update : नववर्षाच्या पहिल्या दिवशी मुंबईत ६३४७ नव्या कोरोनाबाधितांची नोंद; ९१ टक्के बेड रिक्त - मुंबईत कोरोना रुग्णसंख्या वाढली

मुंबईत आज (१ जानेवारीला) ६३४७ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर एका मृत्यूची नोंद झाली आहे. आज ४५१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण ७ लाख ९१ हजार ४५७ रुग्णांची नोंद झाली (New corona cases in mumbai )आहे. विविध रुग्णालयातील ९१ टक्के बेड रिक्त आहेत. रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने मुंबईकरांचे व आरोग्य विभागाचे टेंशन वाढले आहे.

Mumbai Corona Update
Mumbai Corona Update

By

Published : Jan 1, 2022, 7:28 PM IST

मुंबई - मुंबईत डिसेंबर महिन्यापासून पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. डिसेंबरच्या सुरुवातीला १०८ रुग्ण आढळून आले होते. त्यात वाढ होऊन आज (१ जानेवारीला) ६,३४७ नव्या रुग्णांची नोंद (New corona cases in mumbai ) झाली आहे. आज एका मृत्यूचीही नोंद झाली आहे. रुग्णसंख्या वाढली असली तरी बहुसंख्य रुग्ण हे लक्षणे नसलेले असल्याने रुग्णालयातील ९१ टक्के बेड रिक्त आहेत. रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने मुंबईकरांचे व आरोग्य विभागाचे टेंशन वाढले आहे.

६,३४७ नव्या रुग्णांची नोंद -

मुंबईत आज (१ जानेवारीला) ६३४७ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर एका मृत्यूची नोंद झाली आहे. आज ४५१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण ७ लाख ९१ हजार ४५७ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी ७ लाख ५० हजार १५८ रुग्ण बरे झाले आहेत. तर १६ हजार ३७७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. २२ हजार ३३४ सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५ टक्के तर रुग्ण दुपटीचा कालावधी २५१ दिवस इतका आहे. मुंबईमधील १५७ इमारती आणि १० झोपडपट्ट्या सील करण्यात आल्या आहेत. २५ डिसेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत कोरोना वाढीचा दर ०.२८ टक्के इतका आहे.

९१ टक्के बेड रिक्त -

मुंबईत आज आढळून आलेल्या ६३४७ रुग्णांपैकी ५७१२ रुग्ण लक्षणे नसलेले आहेत. आज ३८९ रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागले. मुंबईत रुग्णालयांमध्ये ३०,५६५ बेडस असून त्यापैकी २७६० बेडवर म्हणजेच ९ टक्के बेडवर रुग्ण आहेत. इतर ९१ टक्के बेड रिक्त आहेत.

..अशी वाढली रुग्णसंख्या -

मुंबईत गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण आढळून आला. तेव्हापासून मुंबईत कोरोनाचा प्रसार आहे. फेब्रुवारी महिन्यात दुसरी लाट आली. एप्रिल महिन्यात रुग्णसंख्या ११ हजारावर गेली होती. जूनपासून त्यात घट होऊ लागली. १ डिसेंबरला कोरोनाचे १०८ नवे रुग्ण आढळून आले होते. २ डिसेंबरला त्यात वाढ होऊन २२८ रुग्ण आढळून आले. १७ डिसेंबरला २९५, १९ डिसेंबरला ३३६, २२ डिसेंबरला ४९०, २३ डिसेंबरला ६०२, २४ डिसेंबरला ६८३, २५ डिसेंबर ७५७, २६ डिसेंबर ९२२, २७ डिसेंबरला ८०९, २८ डिसेंबरला १३७७, २९ डिसेंबरला २५१०, ३० डिसेंबर ३६७१, ३१ डिसेंबरला ५६३१, १ जानेवारीला ६३४७ नवीन रुग्ण आढळून आले आहेत.

'या' आठ दिवशी शून्य मृत्यूची नोंद -

मुंबईमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर गेल्या काही महिन्यात १ ते ६ मृत्यूंची नोंद झाली होती. १७ ऑक्टोंबर २०२१ रोजी शून्य मृत्यूची नोंद झालेली आहे. त्यानंतर ११ डिसेंबर, १५ डिसेंबर, १८ डिसेंबर, २० डिसेंबर, २२ डिसेंबर, २५ डिसेंबर, ३० डिसेंबरला शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. मृत्यूची संख्या शून्य होत असल्याने कोरोनामुळे होणारे मृत्यू रोखण्यात पालिकेला यश येत असल्याचे दिसत आहे.

धारावीत २४ रुग्णांची नोंद -

मुंबईतील धारावी ही सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून प्रसिद्ध आहे. या झोपडपट्टीत दाटीवाटीने लोक राहत असल्याने गेल्यावर्षी धारावी कोरोनाची हॉटस्पॉट झाली होती. गेल्या वर्षी पहिल्या लाटेदरम्यान धारावीत दिवसाला ७० हून अधिक रुग्णांची नोंद झाली होती. ८ एप्रिलला दुसऱ्या लाटेत सर्वाधिक ९९ रुग्णांची नोंद झाली होती. त्यानंतर कोरोनाचा प्रसार आटोक्यात आल्याने धारावीत गेले काही महिने १ ते ५ रुग्ण आढळून येत होते. कित्येक वेळा धारावीत शून्य रुग्णांची नोंद झाली आहे. मात्र, आता मुंबईत पुन्हा रुग्णसंख्या वाढल्याने धारावीतही रुग्ण वाढू लागले आहेत. गेल्या २४ तासात धारावीत २४ नवे रुग्ण आढळून आले आहेत. याआधी १८ मे ला सर्वात जास्त रुग्णांची नोंद झाली होती. आज २४ नवे रुग्ण आढळून आल्याने धारावीतील एकूण रुग्णांची संख्या ७,२९७ इतकी झाली आहे. आतापर्यंत ६,७६१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. धारावीत सध्या ११९ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details