महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मुंबई कोरोना अपडेट, 482 नव्या कोरोनाबाधितांची नोंद - 482 people infected with corona Mumbai

मुंबईत आज कोरोनाचे 482 नवे रुग्ण आढळून आले असून, 9 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईमधील कोरोनाग्रस्तांचा आकडा 3 लाख 5 हजार 131 वर पोहोचला आहे. तर, मृतांचा आकडा 11 हजार 285 वर पोहोचला आहे. आज 697 जणांनी कोरोनावर मात केल्याने, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

482 नव्या कोरोनाबाधितांची नोंद
482 नव्या कोरोनाबाधितांची नोंद

By

Published : Jan 22, 2021, 9:47 PM IST

मुंबई - मुंबईत मार्चपासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरू झाला होता. ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढली होती. 16 नोव्हेंबरला 409 तर 18 जानेवारीला 395 इतके सर्वात कमी रुग्ण आढळून आले होते. शुक्रवारी मुंबईत 482 नवे रुग्ण आढळून आले असून, 9 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

6 हजार 442 सक्रिय रुग्ण

मुंबईत आज कोरोनाचे 482 नवे रुग्ण आढळून आले असून, 9 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईमधील कोरोनाग्रस्तांचा आकडा 3 लाख 5 हजार 131 वर पोहोचला आहे. तर, मृतांचा आकडा 11 हजार 285 वर पोहोचला आहे. आज 697 जणांनी कोरोनावर मात केल्याने, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मुंबईत डिस्चार्ज देण्यात आलेल्यांचा आकडा 2 लाख 86 हजार 507 वर गेला आहे. सध्या मुंबईत 6 हजार 442 सक्रिय रुग्ण आहेत.

रुग्ण दुपटीचा कालावधी 447 दिवसांवर

मुंबईत कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94 टक्क्यांवर पोहोचले आहे. रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 447 दिवस तर सरासरी दर 0.21 टक्के आहे. मुंबईत सध्या कोरोनाचे रुग्ण आढळून आलेल्या 165 चाळी आणि झोपडपट्टी कंटेन्मेंट झोन घोषित करून सील करण्यात आल्या आहेत. तसेच 2 हजार 216 इमारती व इमारतीच्या विंग, काही मजले सील करण्यात आले आहेत. तर, कोरोनाचे निदान करण्यासाठी 26 लाख 73 हजार 341 चाचण्या करण्यात आल्या आहेत.

कमी नोंद झालेली रुग्णसंख्या

7 नोव्हेंबर 576 रुग्ण
2 नोव्हेंबर 706 रुग्ण
3 नोव्हेंबर 746 रुग्ण
6 नोव्हेंबर 792 रुग्ण
9 नोव्हेंबर 599 रुग्ण
10 नोव्हेंबर 535 रुग्ण
14 नोव्हेंबर 574 रुग्ण
16 नोव्हेंबर 409 रुग्ण
18 जानेवारी 395 रुग्ण

ABOUT THE AUTHOR

...view details